Home माझं पिंपरी चिंचवड Mahesh Landge Impact :पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय भूकंप | २२ मातब्बर नेत्यांचा भाजपात प्रवेश

Mahesh Landge Impact :पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय भूकंप | २२ मातब्बर नेत्यांचा भाजपात प्रवेश

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीआधी राजकीय उलथापालथ. सर्वपक्षीय २२ दिग्गज नेत्यांचा भाजपात जाहीर प्रवेश. आमदार महेश लांडगे यांचा राष्ट्रवादीवर निर्णायक सर्जिकल स्ट्राईक

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय भूकंप :सर्वपक्षीय २२ मातब्बर नेत्यांचा भाजपात जाहीर प्रवेश!मिशन PCMC : आमदार महेश लांडगे यांचा  (Mahesh Landge Impact) निर्णायक ‘सर्जिकल स्ट्राईक’

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील बारामती गेस्टहाऊसमध्ये भाजपातील काही माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतल्यानंतर, याला जोरदार प्रत्युत्तर देत भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांनी आज सर्वपक्षीय तब्बल २२ मातब्बर नेत्यांचा भाजपात जाहीर प्रवेश घडवून आणला (Mahesh Landge Impact) आहे.

महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे दोन्ही पक्ष स्वबळावर मैदानात उतरले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले( Mahesh Landge Impact) आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, अजित पवारांनी राजकीय ‘टिकल्या’ वाजवल्या असताना, आमदार महेश लांडगे यांनी ‘सुतळी बॉम्ब’ फोडत शहराच्या राजकारणात मोठा धक्का दिला आहे. आगामी महापालिका निवडणूक ही आता “पिंपरी-चिंचवडचा दादा विरुद्ध बारामतीचा दादा” अशीच रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले (Mahesh Landge Impact) आहे.

विशेष म्हणजे, या सर्व प्रवेशांसाठी कोणत्याही स्थानिक नेत्याला दिल्ली किंवा मुंबई दरबारी विशेष ‘फिल्डिंग’ लावावी लागली नाही. यामुळे भाजपाच्या कार्यकाळात शहराचे निर्णय शहरातच घेतले जातात, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आमदार महेश लांडगे यांनी भाजपाचे शहरस्तरीय नेतृत्व सक्षमपणे सांभाळत राष्ट्रवादीला अक्षरशः घायाळ केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा त्यांना ठाम पाठिंबा असल्याचेही या घडामोडींमधून स्पष्ट झाले( Mahesh Landge Impact) आहे.

भाजपात प्रवेश केलेल्या मान्यवरांची यादी :

१) श्री संजोगजी वाघेरे पाटील – माजी महापौर, उबाठा गट

२) सौ. उषाताई वाघेरे – माजी अध्यक्ष, स्थायी समिती

३) श्री प्रशांत शितोळे – माजी अध्यक्ष, स्थायी समिती (राष्ट्रवादी)

४) श्री विनोद नढे – माजी विरोधी पक्षनेते (राष्ट्रवादी)

५) श्री प्रभाकर वाघेरे – माजी उपमहापौर

६) श्री राजू मिसाळ – माजी उपमहापौर

७) श्री अमित गावडे – नगरसेवक, उबाठा गट

८) सौ. मीनलताई यादव – नगरसेविका, उबाठा गट

९) श्री रवी लांडगे

१०) श्री संजय नाना काटे – माजी नगरसेवक

११) सौ. आशाताई सूर्यवंशी – माजी नगरसेविका (राष्ट्रवादी)

१२) श्री प्रविण भालेकर

१३) श्री जालिंदर बापू शिंदे

१४) श्री सचिन सानप (स्वतः व पत्नी)

१५) श्री दादा सुखदेव नरळे (स्वतः व पत्नी)

१६) श्री सदगुरु कदम

१७) श्री समीर मासुळकर (स्वतः व पत्नी)

१८) डॉ. श्री सुहास कांबळे

१९) श्री कुशाग्र कदम

२०) श्री अशोक मगर

२१) श्री नागेश गवळी

२२) श्री प्रसाद शेट्टी – माजी नगरसेवक

२३) श्री नवनाथ जगताप – माजी अध्यक्ष, स्थायी समिती

२४) श्री प्रभाकर वाघेरे – माजी उपमहापौर

प्रतिक्रिया :

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या निमित्ताने शहरातील सर्वपक्षीय मातब्बर नेते, पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष मा. श्री रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. सर्व मान्यवरांचे भाजप परिवारात मनःपूर्वक स्वागत करतो.

देव–देश–धर्म आणि संस्कृतीसाठी कटिबद्ध राहून पिंपरी-चिंचवडमध्ये विकासाभिमुख हिंदुत्वाच्या विचारावर भारतीय जनता पार्टीला निर्विवाद विजय मिळवून देण्याचा आम्ही ठाम निर्धार केला (Mahesh Landge Impact) आहे.

— महेश लांडगे

आमदार, भारतीय जनता पार्टी

पिंपरी-चिंचवड, पुणे


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00