Home माझं पिंपरी चिंचवड Sanjog Waghere Patil:शिवसेना उबाठा पक्षाला मोठा धक्का | संजोग वाघेरे पाटील यांचा राजीनामा

Sanjog Waghere Patil:शिवसेना उबाठा पक्षाला मोठा धक्का | संजोग वाघेरे पाटील यांचा राजीनामा

पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू असून पक्षाला मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाकडे सादर केला आहे. त्यांच्या भारतीय जनता पार्टीत प्रवेशाची चर्चा जोर धरू लागली असून हा प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिलेल्या राजीनाम्यात संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे की, काही अपरिहार्य वैयक्तिक कारणांमुळे सध्या मी माझी संपूर्ण जबाबदारी अपेक्षेप्रमाणे पार पाडू शकत नाही. त्यामुळे सखोल विचार करून शहराध्यक्ष तसेच पक्ष सदस्यत्व या दोन्ही पदांचा राजीनामा देत (Sanjog Waghere Patil)आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी संजोग वाघेरे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर पक्षाने त्यांना मावळ लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांना तब्बल ५ लाख ९६ हजार मते मिळाली होती, त्यामुळे ते राज्यातील चर्चेतील उमेदवार ठरले (Sanjog Waghere Patil)होते.

गेल्या काही दिवसांपासून संजोग वाघेरे पाटील हे शिवसेनेला जय महाराष्ट्र करतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. अखेर आज त्यांनी अधिकृतपणे पक्षाचा राजीनामा दिल्याने या चर्चांना दुजोरा मिळाला आहे.दरम्यान, नुकतीच संजोग वाघेरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिक वेग आला असून, लवकरच ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील, अशी जोरदार शक्यता वर्तवली जात (Sanjog Waghere Patil)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00