Home क्रीडा T20-world Cup 2026 :टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी टीम इंडियाची घोषणा; सूर्यकुमार यादव कर्णधार, अक्षर पटेल उपकर्णधार

T20-world Cup 2026 :टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी टीम इंडियाची घोषणा; सूर्यकुमार यादव कर्णधार, अक्षर पटेल उपकर्णधार

T20 World Cup 2026 साठी टीम इंडियाची घोषणा. सूर्यकुमार यादव कर्णधार, अक्षर पटेल उपकर्णधार. संपूर्ण संघ व भारताचे सामने वाचा.

by Admin
Spread the love

पुढील वर्षी भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी भारतीय संघाची आज अधिकृत घोषणा करण्यात आली. मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात झालेल्या निवड समितीच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्या उपस्थितीत सूर्यकुमार यादव याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली असून अक्षर पटेल याची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली(T20-world Cup 2026 )आहे.

भारतीय संघ (Team India Squad):

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग(,T20-world Cup 2026 )हर्षित राणा.

निवडीत फारसे बदल न करता सातत्याला प्राधान्य देण्यात आले आहे. फलंदाजी विभागात सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर संघाचा समतोल राखतील. गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्याकडे असेल, तर फिरकीत कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती महत्त्वाची भूमिका(T20-world Cup 2026) बजावतील.

यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसन पहिला पर्याय असला तरी इशान किशन यालाही संधी देण्यात आली आहे. निवड समितीच्या मते, सध्याच्या फॉर्म आणि आंतरराष्ट्रीय अनुभवाचा योग्य समतोल साधत हा संघ तयार करण्यात आला(T20-world Cup 2026 )आहे.

ग्रुप स्टेज सामने – भारताचे वेळापत्रक:

७ फेब्रुवारी २०२६ – भारत विरुद्ध अमेरिका, वानखेडे स्टेडियम, मुंबई

१२ फेब्रुवारी २०२६ – भारत विरुद्ध नामिबिया, अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली

१५ फेब्रुवारी २०२६ – भारत विरुद्ध पाकिस्तान, आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो

१८ फेब्रुवारी २०२६ – भारत विरुद्ध नेदरलँड्स, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

बीसीसीआयकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, हाच संघ न्यूझीलंडविरुद्ध जानेवारीत होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतही मैदानात उतरणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कपपूर्वी संघाला स्वतःची रणनीती तपासण्याची मोठी संधी मिळणार (T20-world Cup 2026)आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये आक्रमक खेळ आणि तरुणाईवर विश्वास ठेवत भारताने वर्ल्ड कप २०२६ साठी सज्जता सुरू केली असून, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया नवा इतिहास रचेल का, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले(T20-world Cup 2026) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00