Home गुन्हे Rahatanii Crime News :रहाटणीमध्ये भरदिवसा तरुणावर हल्ला; टोळक्याची बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Rahatanii Crime News :रहाटणीमध्ये भरदिवसा तरुणावर हल्ला; टोळक्याची बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

पिंपरी-चिंचवडच्या रहाटणी परिसरात भररस्त्यात तरुणावर टोळक्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना. दगडांनी मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी परिसरात गुरुवारी भरदिवसा एका तरुणावर टोळक्याने भररस्त्यात हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाढत्या गुंडगिरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला (Rahatanii Crime News) आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, रहाटणी येथील राजरतन डेंटल क्लिनिकसमोर ही घटना घडली. पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाला घेरून अचानक हल्ला चढवला. आरोपींनी लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करतानाच जवळच पडलेले दगड उचलून त्याच्यावर प्रहार केले. काही काळ हा प्रकार सुरूच (Rahatanii Crime News)होता.

 

घटनेच्या वेळी रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक घाबरून गेले. दरम्यान, एका सजग नागरिकाने संपूर्ण घटना मोबाईलमध्ये कैद केली असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत (Rahatanii Crime News)आहे.

 

दरम्यान, या प्रकरणी अद्याप अधिकृत तक्रार दाखल झाली आहे का, याबाबत पोलीस माहिती घेत आहेत. व्हिडिओच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली (Rahatanii Crime News)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00