Home प्रेरणा / यशकथा Ahilyadevi Holkar Jayanti:चिंचवडमध्ये अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त नारीशक्ती गौरव सोहळा; पुस्तक प्रकाशन व काव्यसंमेलन उत्साहात

Ahilyadevi Holkar Jayanti:चिंचवडमध्ये अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त नारीशक्ती गौरव सोहळा; पुस्तक प्रकाशन व काव्यसंमेलन उत्साहात

चिंचवड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त नारीशक्ती गुणगौरव सोहळा, ४ पुस्तकांचे प्रकाशन आणि भव्य काव्यसंमेलन पार पडले. विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान.

by Admin
Spread the love

निगडी :  मा. डॉ. श्रीपाल सबनीस सर व मा. ललिताताई सबनीस यांच्या अध्यक्षतेखालीअध्यक्षतेखाली चिंचवड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त तसेच ८ मार्च महिला दिनानिमित्त “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर – नारीशक्ती गुणगौरव सोहळा”, ४ पुस्तकांचे प्रकाशन व खुले काव्यसंमेलन (Ahilyadevi Holkar Jayanti)  रंगले.

 

“संत तपासणे ही महाराष्ट्रावर नव्हे, तर देशावर आलेली वेळ आहे. आजही बुवाबाजीवर लोक कसा विश्वास ठेवतात, हा मोठा प्रश्न आहे,” असे मत मा. सबनीस सरांनी व्यक्त करत समाजजागृती केली. त्यांनी सर्व पुरस्कार विजेत्या महिलांचे अभिनंदन करून पुस्तकांचे प्रकाशन केले. मा. ललिताताई सबनीस यांनी साहित्यिकांना शुभेच्छा देत “लेखणी अशीच धारदार ठेवा,” असा मोलाचा संदेश (Ahilyadevi Holkar Jayanti)दिला.

 

या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा. पांडुरंग भोसले सर होते. डॉ. शैलेंद्र भणगे यांनी स्वागताध्यक्ष म्हणून भूमिका पार पाडली. मा. पुरुषोत्तम सदाफुले (मामा) यांच्या शुभहस्ते पहिल्या सत्रात पुरस्कार वितरण करण्यात(Ahilyadevi Holkar Jayanti) आले.

 

प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. प्रा. संभाजी मलघे सर, मा. लक्ष्मण शिंदे सर, मा. महादेव रोकडे सर, मा. रज्जाक शेख सर, डॉ. मिलिंद दादा चौधरी, श्री/सौ. अंजना राजू धायगुडे, मा. सीताराम नरके सर, मा. व्यंकटराव वाघमोडे सर, श्री. दत्तू ठोकळे, श्री. आत्माराम हारे सर, समीर गुधाटे, शंकर नाणेकर आदी उपस्थित(Ahilyadevi Holkar Jayanti) होते.

यावेळी सत्कारमूर्ती म्हणून मा. शर्मिलाताई राजेंद्र बाबर (उपमहापौर, पिं.चि.म.न.पा.), मा. शैलजाताई मोरे (नगरसेविका, पिं.चि.म.न.पा.) तसेच मा. सौ. सोनल किशोर जाधव (जागतिक आरोग्य सल्लागार) यांचा विशेष सत्कार करण्यात (Ahilyadevi Holkar Jayanti)आला.

 

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर – हिरकणी गौरव पुरस्कार २०२६” अंतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. साहित्य क्षेत्रात सौ. कविता बाळू काळे, शिक्षिका म्हणून सौ. सारिका गजराज आस्मर, सेविका म्हणून सौ. शरणव्वा नितीन बनसोडे, परिचारिका म्हणून कल्पना रविंद्र यादव, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून उषा मिलिंद भोसले, पत्रकारिता क्षेत्रात कु. गजाला रफिक सय्यद, डॉक्टर म्हणून डॉ. प्राजक्ता महाजन आणि रक्तदाता म्हणून श्रीमती अंजू सोनवणे यांना गौरविण्यात (Ahilyadevi Holkar Jayanti)आले.

 

या सोहळ्यात प्रतिमा काळे यांच्या “काळजातली साद”, “चारोळी संग्रह”, “जागर स्त्री शक्तीचा” या काव्यसंग्रहांचे तसेच धनंजय इंगळे यांच्या “भावगंध” आणि “काव्यसरिता” या काव्यसंग्रहांचे दिमाखात प्रकाशन करण्यात (Ahilyadevi Holkar Jayanti)आले.

 

पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. दिनेश भोसले यांनी केले. दुसऱ्या सत्रातील काव्यसंमेलनाचे अध्यक्ष मा. म. भा. चव्हाण सर होते. स्वागताध्यक्ष मा. राजन लाखे सर, तर उद्घाटक म्हणून मा. अरुण बोराडे सर उपस्थित(Ahilyadevi Holkar Jayanti) होते.

 

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या सुमारे ६० कवींनी आपल्या उत्कृष्ट रचना सादर केल्या. यामध्ये डॉ. बबन चव्हाण, उमेंद्र बिसेन, निवृत्ती पाचपोर, राजेश चौधरी, नामदेव हुले, सतीश कांबळे, अरुण घोडके, सुनिता घोडके, अनघा कुलकर्णी, मनीषा बोटे, आनंद गायकवाड, मेहमुदा शेख, कांचन मून, दत्तू ठोकळे, कविता काळे, जगदीश वनशिव, जयद्रथ आखाडे, योगिता कोठेकर, राहुल भोसले, लक्ष्मण शिंदे, लोपमुद्रा शहारे, गजानन उफाडे, वर्षा शिंदे, रेखा दुसाने, गौरी सुद्रिक, धनश्री ताटे, रेवती साळुंखे, आशा नष्टे, जितेंद्र सोनवणे, प्रा. डॉ. केशव बोरकर, नागोराव सोनकुसळे, निवृत्ती पांचाळ, रेणुका आशिष, अनिला चित्रे, डॉ. आकाश वानखेडे, सुभाष शिंदे, जयराम पारधी, विजय पिलकर, प्रिया घोडके, डॉ. अनिता सुळे, योगेश भोरे, नामदेव घुले, स्नेहा पाठक, सुप्रिया लिमये, गायत्री पाचरे, भाग्यश्री नेलगी, सुभाष चकणे, चंद्रकांत जोगदंड, किशोर केदारे, राजश्री मराठे, धनंजय इंगळे, प्रतिमा काळे, स्वाती भोसले, प्रा. आण्णासाहेब चोरमले आदींचा समावेश (Ahilyadevi Holkar Jayanti)होता.

 

दुसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन सौ. राजश्री मराठे यांनी केले. या भव्य सोहळ्याचे आयोजन सौ. प्रतिमा काळे (खेमनर) व धनंजय इंगळे यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन श्री/सौ. अंजना राजू धायगुडे यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन आयोजक प्रतिमा काळे यांनी (Ahilyadevi Holkar Jayanti)केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00