Home माझं पिंपरी चिंचवड Election Update,PCMC:प्रभाग क्रमांक १५ निगडी–आकुर्डी | वाढती मतदारसंख्या, राजकीय समीकरणे तापली

Election Update,PCMC:प्रभाग क्रमांक १५ निगडी–आकुर्डी | वाढती मतदारसंख्या, राजकीय समीकरणे तापली

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १५ निगडी–आकुर्डी प्राधिकरणातील मतदारसंख्या, स्थानिक प्रश्न आणि राजकीय तयारीचा सविस्तर आढावा.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १५ – निगडी, आकुर्डी व प्राधिकरण परिसर हा प्रभाग राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार या प्रभागात एकूण ४७ हजार ८९८ मतदार असून त्यापैकी २४ हजार ८१६ पुरुष मतदार आहेत. उर्वरित मतदारांमध्ये महिला व इतर (Election Update,PCMC) मतदारांचा समावेश आहे.

प्रभागात मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय नागरिक, शासकीय व खासगी नोकरी करणारे मतदार, तसेच व्यावसायिक वर्ग आहे. निवासी सोसायट्या, प्राधिकरणातील नियोजित वसाहती, शिक्षण संस्था व व्यापारी संकुले यामुळे या प्रभागाचा मतदारसंघ प्रभावी मानला(Election Update,PCMC) जातो. 

राजकीय गणित काय सांगते?

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक १५ मध्ये २० ते २५ मतदान केंद्रे असून मागील निवडणुकांमध्ये येथे ६० टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. यंदा नवमतदारांची संख्या वाढल्याने मतदानाची टक्केवारी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात (Election Update,PCMC)आहे.

हा प्रभाग परंपरेने चुरशीच्या लढतींसाठी ओळखला जातो. भाजप, राष्ट्रवादी (दोन्ही गट), शिवसेना तसेच काँग्रेसकडून या प्रभागावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. प्रत्येक पक्षाकडून स्थानिक प्रश्नांवर आधारित प्रचारावर भर दिला जात असून, कार्यकर्त्यांच्या बैठका, घरोघरी संपर्क मोहिमा सुरू झाल्या(Election Update,PCMC) आहेत.

स्थानिक मुद्दे ठरणार निर्णायक

वाहतूक कोंडी, अंतर्गत रस्त्यांची अवस्था, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, उद्याने व पार्किंगची समस्या हे प्रश्न मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. त्याचबरोबर विकासकामांचा लेखाजोखा, मागील नगरसेवकांचे कार्य आणि आगामी पाच वर्षांचा विकास आराखडा यावरच मतदारांचा कौल अवलंबून राहणार असल्याचे चित्र (Election Update,PCMC)आहे.

वाढती मतदारसंख्या, सुशिक्षित मतदार आणि राजकीय पक्षांमधील जोरदार तयारी पाहता प्रभाग क्रमांक १५ मध्ये यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची व निकालाकडे सर्वांचे लक्ष वेधणारी ठरणार,(Election Update,PCMC )हे निश्चित.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00