Home माझं पिंपरी चिंचवड Political Controversy:पवारांचा थेट एकेरी उल्लेख; महेश लांडगेंकडून अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल

Political Controversy:पवारांचा थेट एकेरी उल्लेख; महेश लांडगेंकडून अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल

by Admin
Spread the love

पिंपरी: भाजपचे आमदार पैलवान महेश लांडगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील राजकीय वाद अधिक तीव्र झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. महेश लांडगेंनी थेट एकेरी भाषेत अजित पवारांवर निशाणा साधत “आम्ही काय बांगड्या घातल्यात का?” असा सवाल केला (Political Controversy) आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख केल्यानंतर काही नेते संध्याकाळी भाजपमध्ये दाखल झाले, असा टोला लगावत लांडगेंनी अजित पवारांना डिवचले. “देवा भाऊ इशारा दिल्यावर घोटाळे करणारे आणि घोटाळे काढणारेही एकत्र येतात,” असे म्हणत त्यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्ष आरोप(Political Controversy) केला.

पिंपरी-चिंचवडमध्ये भ्रष्टाचाराचा ‘आका’ असल्याचा आरोप अजित पवारांनी केल्यानंतर संतप्त झालेल्या महेश लांडगेंनी आक्रमक भूमिका घेतली. “तू आमचा कार्यक्रम करणार म्हणतोस, मग आम्ही काय बांगड्या घातल्यात का? तुझा कार्यक्रम आमच्या लाडक्या बहिणी करतील. आमच्या नादी लागू नको,” अशा शब्दांत लांडगेंनी एकेरी टीका केली. तसेच “आता डोक्यात गदा घालण्याची वेळ आली आहे,” असा थेट इशाराही त्यांनी(Political Controversy) दिला.

महेश लांडगेंनी यापूर्वीही अजित पवारांवर जोरदार टीका करत “अजित पवार हे महाराष्ट्राचे आका आहेत,” असे म्हटले होते. “स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये आलेल्या लोकांनी आमच्यावर आरोप करू नयेत. आधी स्वतःच्या कुटुंबातील पराक्रम पाहावेत,” असा पलटवारही त्यांनी केला. “जे स्वतःच्या काकांचे होऊ शकले नाहीत, ते पिंपरी-चिंचवडचे काय होतील?” असा सवाल करत लांडगेंनी राजकीय कुस्तीचे आव्हान(Political Controversy) दिले.

दरम्यान, महेश लांडगेंच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “मी कोण आहे हे जनता ठरवेल. 15 तारखेपर्यंत थांबा, उत्तर मिळेल.” त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘अलार्म – पाच काम’ या कॅम्पेनबाबत माहिती देत सांगितले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील खड्डे, कचरा, वाहतूक कोंडी, पाणीटंचाई आणि गुन्हेगारी या मुद्द्यांवरून भाजपच्या स्थानिक कारभारावर टीका करण्यात आली आहे. हे गाणे राज्य किंवा केंद्र सरकारविरोधात नसून केवळ स्थानिक प्रश्नांपुरते मर्यादित असल्याचेही त्यांनी स्पष्ट (Political Controversy) केले.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार विरुद्ध महेश लांडगे असा थेट राजकीय सामना रंगताना दिसत असून, येत्या काळात या वादाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात (Political Controversy) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00