प्रतिनिधी :मध्यपूर्वेतील वाढत्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता जागतिक बाजारपेठेसह भारतावरही दिसू लागला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात वाढत चाललेल्या संघर्षामुळे ऊर्जा बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम घरगुती एलपीजी गॅसच्या दरांवर झाला आहे. राज्यात १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत ६० रुपयांची वाढ करण्यात आली असून आजपासून नवे दर लागू झाले (LPG Cylinder Hike)आहेत.
या दरवाढीनंतर महाराष्ट्रात आतापर्यंत सुमारे ८६० रुपयांना मिळणारा घरगुती गॅस सिलेंडर आता ९२० रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे या वाढीचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार(LPG Cylinder Hike) आहे.
भारत हा एलपीजी आयात करणाऱ्या देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून देशातील मोठा गॅस पुरवठा आयातीवर अवलंबून आहे. देशाच्या एलपीजी गरजांपैकी जवळपास दोन तृतीयांश गरजा आयातीद्वारे पूर्ण केल्या जातात आणि त्यातील सुमारे ८५ ते ९० टक्के पुरवठा मध्यपूर्वेतील देशांकडून केला (LPG Cylinder Hike)जातो.
दरम्यान, इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत नाकेबंदी केल्यामुळे या मार्गावरील तेल आणि गॅस वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर दबाव निर्माण झाला असून त्याचे परिणाम विविध देशांमध्ये दिसू लागले (LPG Cylinder Hike)आहेत.
या पार्श्वभूमीवर भारतात एलपीजीचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संभाव्य तुटवडा लक्षात घेऊन केंद्र सरकारने देशातील रिफायनरींना एलपीजी उत्पादन वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, मध्यपूर्वेतील संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिल्यास भविष्यात गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात (LPG Cylinder Hike)आहे.
