पिंपरी-चिंचवड : महिला दिन आणि होळीच्या औचित्याने कर्मयोगिनी महिला संस्थेच्या वतीने कवी संमेलन आणि “आठवणींचा गाव” या आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. साहित्य, गाणी, गोष्टी आणि मनमोकळ्या गप्पांचा सुंदर संगम घडवणाऱ्या या कार्यक्रमाने उपस्थित रसिकांना अक्षरशः उत्सवाच्या रंगात रंगवून (Women’s Day ) टाकले.
कवी संमेलनात कवयित्री रश्मी कांकरिया, दत्तू ठोकळे, वैशाली गावंडे, शामराव सरकाळे, देवेंद्र गावंडे, माधुरी डिसूजा, शशिकला देवकर आणि राजश्री वाघमारे यांनी भावस्पर्शी, विनोदी आणि मनाला भिडणाऱ्या काव्यरचना सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या काव्यसादरीकरणाला रसिकांकडून उत्स्फूर्त दाद (Women’s Day) मिळाली.
तसेच रंगमुद्रा थिएटर फाउंडेशन प्रस्तुत “आठवणींचा गाव” या कार्यक्रमात नरेंद्र आमले, साक्षी देवरे, सुनिता बोडस, प्रशांत कुलकर्णी आणि वनश्री कोल्हटकर यांनी कविता, नृत्य, गोष्टी आणि गप्पांच्या माध्यमातून स्त्रीचे भावविश्व प्रभावीपणे उलगडून रसिकांना मंत्रमुग्ध (Women’s Day) केले.
यावेळी “ताईची वुशु” या चिनी क्रीडाप्रकाराबाबत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या डॉ. जॅस्मिन पोकरणा यांनी माहिती देत त्यामागील संकल्पना आणि उद्देश उपस्थितांसमोर(Women’s Day) मांडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा छायाताई कांकरिया यांनी चिंचवडचे आराध्य दैवत मोरया गोसावी यांच्यावर रचलेली कविता सादर केली. अतिथी मनोगतात डॉ. पौर्णिमा कोल्हे यांनी कवितेवर केलेल्या भाष्याला उपस्थितांनी मनमुराद दाद दिली. मीनाताई पोकरणा यांच्या ‘खुशबू’ या वास्तूत हा सोहळा संपन्न (Women’s Day) झाला.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, अपर्णा डोके तसेच नवयुगचे राज अहेरराव हेही उपस्थित होते. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आणि होळीच्या आनंददायी वातावरणात रंगलेला हा साहित्यिक-सांस्कृतिक सोहळा उपस्थितांच्या मनात आठवणींचे रंग भरून (Women’s Day) गेला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व निवेदन कर्मयोगिनी संस्थेच्या संस्थापिका-अध्यक्षा सीमा शिरीष गांधी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अभय पोकरणा, नील गांधी आणि शांतीलाल गांधी यांनी सहकार्य केले. सलोनी गांधी यांनी आभार (Women’s Day) मानले.
