प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी संजय पटनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न यांच्या स्वाक्षरीने त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. संजय पटनी हे आमदार महेश लांडगे यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून ओळखले जातात. पक्षाच्या संघटनात्मक कामात त्यांचा सक्रिय सहभाग असून विविध सामाजिक उपक्रमांद्वारे त्यांनी पक्षकार्य बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले (Sanjay Patani pcmc)_आहेत.
नवनियुक्त वरिष्ठ उपाध्यक्ष संजय पटनी हे गेल्या १२ वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. यापूर्वी त्यांनी पक्षाच्या अनेक संघटनात्मक उपक्रमांमध्ये पुढाकार घेतला आहे. प्रसिद्धीप्रमुख म्हणूनही त्यांनी आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी सक्षमपणे पार पाडल्या आहेत. बूथ प्रमुख ते शहराध्यक्ष आणि शहराध्यक्ष ते प्रदेश कार्यालय अशा विविध पातळ्यांवर प्रभावी समन्वय साधणारा कार्यकर्ता म्हणून पक्षात त्यांची ओळख (Sanjay Patani pcmc)आहे.
दरम्यान, पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने इतर काही महत्त्वाच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय खेळाडू अरुण पाडुळे यांची भाजपा क्रीडा प्रकोष्ठाच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दिघी-गव्हाणेवस्ती-गवळीनगर मंडलाध्यक्षपदी प्रमोद परदेशी तर चिखली-कृष्णानगर मंडलाध्यक्षपदी अजय साने यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे शहरातील भाजप संघटनाला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आगामी निवडणुका आणि संघटनात्मक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असेही त्यांनी (Sanjay Patani pcmc)सांगितले.
नियुक्तीबद्दल संजय पटनी यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले असून पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, पक्षाच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत (Sanjay Patani pcmc)आहे.
भारतीय जनता पक्षाने पिंपरी-चिंचवड शहराच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदाची दिलेली जबाबदारी मी पूर्ण प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडेन. पक्ष संघटना तळागाळापर्यंत अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने काम केले जाईल. बूथ पातळीपासून शहर आणि प्रदेश पातळीपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये प्रभावी समन्वय साधून पक्षाचे विचार आणि विकासाची भूमिका अधिक व्यापकपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जाईल.
पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी कृतज्ञ आहे. माझे नेते आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात संघटनात्मक आणि सामाजिक उपक्रम अधिक जोमाने राबवून भाजपा संघटन बळकट करण्यासाठी कटिबद्ध (Sanjay Patani pcmc)आहे.
संजय पटनी
वरिष्ठ उपाध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड
