Home आरोग्य Leprosy Drive:पिंपरी-चिंचवडमध्ये कुष्ठरोग शोध मोहीम सुरू

Leprosy Drive:पिंपरी-चिंचवडमध्ये कुष्ठरोग शोध मोहीम सुरू

by Admin
Spread the love

 

पिंपरी प्रतिनिधी :केंद्र शासनाच्या आदेशानुसार राज्यभर १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही शहरात या मोहिमेची सुरुवात केली आहे. (Leprosy Detection Drive) महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत सर्व प्रभागांमध्ये घराघरांत भेटी देऊन नागरिकांची विनामूल्य तपासणी करण्यात येत  (Leprosy Drive) आहे.

या पथकांमध्ये आशा स्वयंसेविका तसेच प्रशिक्षित Subhanallah सहभाग असून, ते सलग चौदा दिवस सर्वेक्षण करणार आहेत. (Leprosy Detection Drive) प्रत्येक पथक दररोज गृहभेटी देऊन त्वचेवरील पांढरे चट्टे, सुन्नपणा, नसांवरील सूज किंवा संवेदना कमी होणे अशा संभाव्य लक्षणांची तपासणी (Leprosy Drive) करत आहे.

 

अशापैकी कोणतीही संशयास्पद लक्षणे आढळल्यास संबंधित नागरिकांना पुढील तपासणी आणि उपचारासाठी महापालिकेच्या रुग्णालयात पाठविण्यात येते. ‘महापालिकेची पथके नागरिकांशी संवाद साधत तपासणी करत आहेत. (Leprosy Detection Drive) रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी वैद्यकीय विभाग सज्ज आहे. नागरिकांनी वर नमूद केलेली लक्षणे जाणवल्यास तात्काळ महापालिका रुग्णालयाशी संपर्क साधावा’, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी  (Leprosy Drive)केले आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00