Home आरोग्य Fake Medicen Scam:पुण्यात बनावट ‘चायमोरल फोर्टे’ गोळ्यांचा साठा; एफडीए पुणे विभागाकडून मोठी चौकशी सुरू

Fake Medicen Scam:पुण्यात बनावट ‘चायमोरल फोर्टे’ गोळ्यांचा साठा; एफडीए पुणे विभागाकडून मोठी चौकशी सुरू

पुण्यात Chymoral Forte (Trypsin–Chymotrypsin) या औषधांच्या बनावट गोळ्या विक्रीचा प्रकार उघडकीस आला असून FDA पुणे विभागाने नमुने जप्त करून तपास सुरू केला आहे.

by Admin
Spread the love

पुणे – शहरात बनावट औषधांचा धोकादायक प्रकार समोर आला असून, ट्रिप्सिन–चायमोट्रिप्सिन (Chymoral Forte) या प्रसिद्ध औषधाच्या बनावट गोळ्या विक्रीसाठी आणल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन (FDA), पुणे विभागाला प्राप्त झाली आहे. या माहितीच्या आधारे एफडीएने तातडीने मोठ्या प्रमाणात चौकशी सुरू (Fake Medicen Scam)केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, संबंधित बनावट औषधांवर Batch No. 2KU6L055, उत्पादन दिनांक डिसेंबर 2024, मुदत संपण्याची तारीख नोव्हेंबर 2027, उत्पादन परवाना क्रमांक M/564/2010 असा तपशील छापण्यात आला असून, या औषधांची निर्मिती टॉरेंट फार्मास्युटिकल्स लिमिटेड, सिक्कीम येथे झाल्याचा खोटा दावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात हा संपूर्ण तपशील संशयास्पद असून औषधे बनावट असल्याचा प्राथमिक अंदाज एफडीएने व्यक्त केला(Fake Medicen Scam )आहे.

या गोपनीय माहितीच्या आधारे एफडीए पुणे विभागातील औषध निरीक्षकांनी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पुण्यातील सदाशिव पेठ येथील अक्षय फार्मा या औषध विक्रेत्याकडून संबंधित औषधांचे नमुने अधिकृतरीत्या जप्त करून तपासणीसाठी घेतले. हे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्याचबरोबर औषधांची सत्यता तपासण्यासाठी संबंधित नमुने टॉरेंट फार्मास्युटिकल्स लिमिटेड, सिक्कीम येथेही पडताळणीसाठी (Fake Medicen Scam)पाठवण्यात आले आहेत.

एफडीए अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात बनावट औषधांचा पुरवठा साखळी (Supply Chain) नेमकी कुठून सुरू झाली, पुण्यात किती ठिकाणी अशी औषधे वितरित करण्यात आली, तसेच या प्रकारामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे, याचा सखोल तपास सुरू आहे. तपासात दोषी आढळणाऱ्यांवर औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, १९४० अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही एफडीएने (Fake Medicen Scam)स्पष्ट केले आहे.

दरम्यान, बनावट औषधांचा वापर रुग्णांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकतो. त्यामुळे औषध विक्रेत्यांनी अधिकृत पुरवठादारांकडूनच औषधे खरेदी करावीत, तसेच नागरिकांनी संशयास्पद औषधांबाबत तात्काळ एफडीएशी संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून( Fake Medicen Scam)करण्यात आले आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00