Home गुन्हे Bhosri Crime News:भोसरीत कारचालकावर विनाकारण हल्ला; मोबाईल चोरी प्रकरणी दोन गुंड अटकेत |

Bhosri Crime News:भोसरीत कारचालकावर विनाकारण हल्ला; मोबाईल चोरी प्रकरणी दोन गुंड अटकेत |

भोसरी परिसरात कारचालकाला मारहाण करून मोबाईल व कारची चावी हिसकावणाऱ्या दोन तरुणांना भोसरी पोलिसांनी अटक केली. स्पाइन रोडवरील गोडाऊन चौकाजवळ मध्यरात्रीची घटना

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरात भरधाव मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी एका कारचालकाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण केल्याची तसेच त्याचा मोबाईल फोन आणि कारची चावी जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. ११) रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास स्पाइन रोडवरील गोडाऊन चौकाजवळ (Bhosri Crime News)घडला.

 

याप्रकरणी अमर पुण्याराम सिंग भैरव (वय ३२, रा. निगडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी तातडीने आणि प्रभावी कारवाई करत अवघ्या काही तासांत दोन आरोपींना (Bhosri Crime News)अटक केली.

 

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आदित्य लक्ष्मण विरणक (वय २४, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) आणि उद्धव उत्तम पाटोळे (वय २५, रा. भोसरी) अशी (Bhosri Crime News)आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमर सिंग हे आपल्या कारमध्ये बसले असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन्ही आरोपींनी अचानक त्यांच्या कारजवळ येऊन थेट कारमध्ये प्रवेश केला. कोणतेही कारण नसताना आरोपींनी अमर सिंग यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर त्यांचा मौल्यवान मोबाईल फोन आणि कारची चावी जबरदस्तीने हिसकावून घेऊन आरोपी घटनास्थळावरून पळून )Bhosri Crime News)गेले.

 

या घटनेनंतर अमर सिंग यांनी तात्काळ भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपींनी विनाकारण हा हल्ला का केला, त्यांचा नेमका उद्देश काय होता, याचा पुढील तपास भोसरी पोलीस करत (Bhosri Crime Newsआहेत.

 

या घटनेमुळे भोसरी परिसरासह शहरातील रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, विशेषतः रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली (Bhosri Crime News)जात आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00