Home माझं पिंपरी चिंचवड Chief Minister Ambition:काकांच्या पुण्याईने लई चांगलं चाललंय, पण आता मुख्यमंत्री व्हायची संधी हुकतेय; अजित पवारांनी व्यक्त केली खंत

Chief Minister Ambition:काकांच्या पुण्याईने लई चांगलं चाललंय, पण आता मुख्यमंत्री व्हायची संधी हुकतेय; अजित पवारांनी व्यक्त केली खंत

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:”मी आतापर्यंत सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भूषवले आहे. मुख्यमंत्री हा शब्द वारंवार तोंडात येतो, पण ती संधी हुकते,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतची आपली सुप्त इच्छा आणि खंत बोलून दाखवली. पिंपरी-चिंचवड येथील जाहीर सभेत बोलताना त्यांनी, “जर लाडक्या बहिणींचा आशीर्वाद पाठीशी असेल, तर नक्कीच मुख्यमंत्रीही होऊ,” असा विश्वास व्यक्त करत आगामी राजकीय महत्त्वाकांक्षा अधोरेखित (Chief Minister Ambition) केल्या.

आमदार महेश लांडगे यांच्यावर वैयक्तिक टीका
या सभेत अजित पवार यांनी भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली. लांडगे यांचे नाव न घेता पवार म्हणाले, “काहींच्या बाबतीत माझे मीठ अळणी निघाले, याचा मला आता पश्चाताप होत आहे. काय होतास तू आणि काय झालास? भंगार गाड्या इकडून तिकडे घेऊन जाणाऱ्यांना मी नगरसेवक केले. अशा भंगारवाल्यांकडे शहराच्या विकासाचे काय व्हिजन असणार?” असा टोला त्यांनी लगावला. तसेच, महापालिकेतील भ्रष्टाचाराचा राक्षस हटवण्यासाठी आता वेळ आली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘माझं नाणं खणखणीत, कार्यकर्त्यांना त्रास दिला तर गाठ माझ्याशी’
आपल्या आक्रमक शैलीत विरोधकांना इशारा देताना अजित पवार म्हणाले की, “माझं नाणं खणखणीत आहे आणि माझं काम बोलतं, मी कोणाच्या बापाचा मिंदा नाही. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून ते आता उमेदवारांना दमदाटी करत आहेत. जर माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला, तर हा अजित पवार असा डाव टाकेल की समोरच्याला पळता भुई थोडी होईल. मी गेल्या १२ वर्षांपासून महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचा अध्यक्ष आहे, मला डावपेच चांगलेच माहिती आहेत,” असा दमही त्यांनी(Chief Minister Ambition) भरला.

‘माझं नाणं खणखणीत आहे; कार्यकर्त्यांना त्रास दिला तर गाठ माझ्याशी’

आपल्या खास आक्रमक शैलीत अजित पवार यांनी विरोधकांना थेट इशाराच दिला.

“माझं नाणं खणखणीत आहे, माझं काम बोलतं. मी कोणाच्या बापाचा मिंदा नाही. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, म्हणून ते उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना दमदाटी करत आहेत,” असे त्यांनी ठणकावून(Chief Minister Ambition) सांगितले.

“जर माझ्या कार्यकर्त्यांना कुणी त्रास दिला, तर हा अजित पवार असा डाव टाकेल की समोरच्याला पळता भुई थोडी होईल. मी गेली १२ वर्षं महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचा अध्यक्ष आहे; डावपेच मला चांगलेच माहिती आहेत,” असा दमही त्यांनी (Chief Minister Ambition) भरला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना त्यांनी वाढत्या कर्जाबद्दल चिंता व्यक्त केली. “९ हजार कोटींचे बजेट असताना महापालिकेवर कर्ज काढण्याची वेळ का आली?. शहरात टँकर माफिया आणि भ्रष्टाचार बोकाळला आहे. घराच्या बांधकामाला साधा टिकाव मारला तरी ठराविक लोकांकडून सिमेंट आणि विटा घेण्याच्या धमक्या दिल्या जातात. ही गुंडगिरी मोडून काढण्यासाठी १५ तारखेला ‘नासक्या आंब्याला’ (विरोधकांना) बाजूला करा,” असे आवाहन त्यांनी मतदारांना(Chief Minister Ambition) केले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00