Home गुन्हे PCMC Drug Racket : पिंपरी-चिंचवडमध्ये अमली पदार्थ प्रकरण उघड; पती-पत्नी अटकेत

PCMC Drug Racket : पिंपरी-चिंचवडमध्ये अमली पदार्थ प्रकरण उघड; पती-पत्नी अटकेत

हिंजवडी परिसरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ६.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त, ड्रग ॲनालायझर किटचा पहिल्यांदाच वापर

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड परिसरात अमली पदार्थांचे मिश्रण तयार करून त्याची विक्री करणाऱ्या एका युनिटवर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत पती-पत्नीला अटक करण्यात आली असून सुमारे ६ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला(PCMC Drug Racket) आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे कैलास दत्तात्रय मांढरे (वय ५४) आणि अनुराधा कैलास मांढरे (वय ५४, रा. आकुर्डी, पुणे) अशी आहेत. हे दोघे अमली पदार्थांचे मिश्रण तयार करून ते पान व गुटखा जन्य पदार्थांमध्ये मिसळून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली (PCMC Drug Racket) होती.

गुप्त माहितीनंतर सापळा

लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान कैलास मांढरे अमली पदार्थ मिश्रित पावडर तयार करत असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जांबेगाव ग्रामपंचायत परिसरातील ‘चैतन्य फूड गोदाम’ येथे छापा (PCMC Drug Racket)टाकला.

छाप्यात आरोपी अमली पदार्थांचे मिश्रण तयार करताना आढळून आले. घटनास्थळावरून अमली पदार्थ मिश्रित पावडर, द्रवरूपातील अमली पदार्थ, तीन मोबाईल फोन, एक चारचाकी वाहन तसेच विविध यंत्रसामग्री असा मोठा साठा जप्त करण्यात (PCMC Drug Racket)आला.

एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा

या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), १७(ब), २२(ब) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला (PCMC Drug Racket)आहे.

ड्रग ॲनालायझर किटचा प्रथमच वापर

या कारवाईत विशेष म्हणजे अमली पदार्थांचा वापर झाल्याची खात्री करण्यासाठी ड्रग ॲनालायझर किटचा प्रथमच वापर करण्यात आला. तपासणीदरम्यान जप्त केलेल्या पदार्थांमध्ये अफूसारख्या अमली पदार्थाचे अंश आढळल्याची माहिती पोलिसांनी (PCMC Drug Racket)दिली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अमली पदार्थ विरोधी पथक-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नाईक आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई पार(PCMC Drug Racket) पाडली.

विशेष मोहिमेचा भाग

पिंपरी-चिंचवड परिसरात अमली पदार्थांचा फैलाव रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू (PCMC Drug Racket)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00