प्रतिनिधी :आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (Pimpri-Chinchwad) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संतुलित प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर समस्त ब्राह्मण संघाच्या प्रतिनिधींनी आमदार शंकर जगताप यांची सदिच्छा भेट घेतली. पिंपरी-चिंचवड शहराची जबाबदारी त्यांच्या हाती असल्याने या भेटीला विशेष महत्त्व (Pcmc Bramhan Sangh) प्राप्त झाले.
याआधीही संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवडचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न काटे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ तसेच प्रदेशाध्यक्ष रविंद्रजित चव्हाण यांच्याशी या विषयावर चर्चा केली होती. सर्व मान्यवरांनी ब्राह्मण समाजाबद्दल आपुलकी व्यक्त करत, समाज भारतीय जनता पक्षासोबत निष्ठेने उभा असल्याबद्दल कौतुक (Pcmc Bramhan Sangh)केले होते.
आमदार जगताप यांच्यासोबत झालेल्या चर्चेत त्यांनीही समाजाबाबत सकारात्मक आणि संवेदनशील भूमिका कायम ठेवत संतुलित प्रतिनिधित्वाची गरज मान्य केल्याचे संघाच्या प्रतिनिधींनी सांगितले. त्यांच्या पूर्वीच्या संवादांप्रमाणेच या भेटीतही त्यांनी समाजाबद्दल सातत्याने सकारात्मक भूमिका दाखविल्याचे स्पष्ट झाल्याचेही सदस्यांनी नमूद (Pcmc Bramhan Sangh)केले.
बैठकीत ब्राह्मण समाज हा भारतीय जनता पक्षासोबत कायम निष्ठेने, श्रद्धेने आणि ठामपणे उभा आहे व पुढेही राहील, हे ठामपणे मांडण्यात आले. हिंदुत्व, सामाजिक समरसता आणि राष्ट्रउन्नती हेच समाजाचे विचार असून, याच विचारांवर भारतीय जनता पक्ष कार्यरत असल्याचेही स्पष्ट (Pcmc Bramhan Sangh)करण्यात आले.
तसेच हिंदुत्व आणि सामाजिक समरसतेच्या विचारांनी कार्यरत असलेल्या ब्राह्मण समाजातील कार्यकर्त्यांना त्यांच्या संबंधित प्रभागांमध्ये योग्य संधी द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन या भेटीत आमदार जगताप यांना सुपूर्द (Pcmc Bramhan Sangh)करण्यात आले.
या प्रसंगी समस्त ब्राह्मण संघाच्या वतीने रोहन जोशी, राहुल ताम्हणकर, परीक्षित कुलकर्णी, सागर, अभिषेक करवंदे तसेच डॉ. सचिन बोधनी (Pcmc Bramhan Sangh)उपस्थित होते.
