80
पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी परिसरात गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास अल्पवयीन मुलांनी मिठाईच्या दुकानात तोडफोड केली. अवघ्या दहा सेकंदांत घडलेली ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (Crime News)स्पष्टपणे कैद झाली आहे.
काळेवाडी पोलिसांनी तातडीने तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, ज्याच्या सांगण्यावरून हा प्रकार घडवून आणला गेला त्या मुख्य सूत्रधाराचा शोध(Crime News) अद्याप सुरू आहे.
हातात कोयते घेऊन अल्पवयीन मुलांनी केलेली ही तोडफोड पाहून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रकरणी अधिक तपास सुरू असून पोलिसांकडून(Crime News )सखोल चौकशी केली जात आहे.
