Home प्रेरणा / यशकथा Statue Of Hindubhushan:दिवाळीपूर्वी पूर्ण होणार ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’; शंभूसृष्टीच्या कामाला वेग

Statue Of Hindubhushan:दिवाळीपूर्वी पूर्ण होणार ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’; शंभूसृष्टीच्या कामाला वेग

पिंपरी-चिंचवडमधील मोशी-बोऱ्हाडेवाडी येथे उभारल्या जाणाऱ्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ प्रकल्पाचे काम दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून साकारत असलेल्या शंभूसृष्टी प्रकल्पाला आता अधिक गती मिळणार आहे.

by Admin
Spread the love

 पिंपरी -चिंचवड : हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणाऱ्या जगातील सर्वात उंच ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ प्रकल्पाच्या कामाला आता अधिक गती मिळणार आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हे स्मारक दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात (Statue Of Hindubhushan)आले.

मोशी-बोऱ्हाडेवाडी येथे साकारत असलेल्या या भव्य ‘शंभूसृष्टी’ प्रकल्पासाठी पालिकेतील विविध विभागांमध्ये समन्वय राखण्याची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त-१ विक्रांत बगाडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तसेच उर्वरित कामासाठी स्वतंत्र ‘टाईम बाउंड अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून, आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही आयुक्तांनी(Statue Of Hindubhushan) दिली.

बैठकीत स्मारकाच्या प्रवेशद्वाराला ऐतिहासिक स्वरूप देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाला साजेसं भव्य, प्रेरणादायी आणि भावी पिढ्यांसाठी स्फूर्तीस्थळ ठरणारं हे स्मारक पिंपरी-चिंचवडच्या वैभवात भर घालणार असल्याची भावना व्यक्त करण्यात

(Statue Of Hindubhushan)

आली.

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त-२ तृप्ती सांडभोर, सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, माणिक चव्हाण (विद्युत), कार्यकारी अभियंता नरोटे, सल्लागार आणि ठेकेदार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित(Statue Of Hindubhushan)होते.

भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून साकारत असलेला हा प्रकल्प महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात

(Statue Of Hindubhushan)

आहे.

प्रतिक्रिया

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि हिंदवी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान आगामी पिढ्यांपर्यंत पोहोचावे, हीच ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ उभारण्यामागची प्रेरणा आहे. मोशी-बोर्‍हाडेवाडी येथे साकारत असलेले हे स्मारक केवळ शिल्प नसून तमाम शिव-शंभूप्रेमींसाठी प्रेरणा, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीचे स्फूर्तीस्थळ ठरेल. दिवाळीपूर्वी शंभूसृष्टीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या(Statue Of Hindubhushan)आहेत.”

— महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00