पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र रामदास बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा खासदार के. सी. वेणूगोपाल यांनी महाराष्ट्रातील ६९ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये बनसोडे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात (Pcmc Congress President)आहे.
माजी शहराध्यक्ष कैलास कदम यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी पदाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या पाच महिन्यांपासून शहराध्यक्षपद रिक्त होते. या काळात शहर काँग्रेस नेतृत्वाविना कार्यरत होती. त्याचा परिणाम पक्षाच्या निवडणूक कामगिरीवरही झाल्याचे दिसून आले. एकेकाळी पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसला यावेळी एकही उमेदवार विजयी करता आला नाही. त्यामुळे शहरातील काँग्रेस संघटना कमकुवत झाल्याचे स्पष्ट (Pcmc Congress President)झाले.
अशा परिस्थितीत नरेंद्र बनसोडे यांच्या खांद्यावर पक्ष संघटना नव्याने उभी करण्याची मोठी जबाबदारी आली आहे. महापालिकेत प्रतिनिधित्व नसल्यामुळे काँग्रेसला आता स्थानिक प्रश्न, जनआंदोलन आणि सामाजिक विषयांवर अधिक आक्रमक भूमिका घ्यावी लागणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात (Pcmc Congress President)आहे.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढत्या प्रभावामध्ये काँग्रेसला पुन्हा राजकीय स्थान निर्माण करण्यासाठी संघटनात्मक पातळीवर मोठे काम करावे लागणार आहे. विशेषतः दलित, कामगार आणि मध्यमवर्गीय मतदारांमध्ये पक्षाचा पारंपरिक प्रभाव पुन्हा मजबूत करण्याचे आव्हान बनसोडे यांच्यासमोर असणार(Pcmc Congress President) आहे.
अजमेरा-मासुळकर कॉलनी परिसरातील रहिवासी असलेले नरेंद्र बनसोडे हे युवक काँग्रेसमधून पुढे आलेले संघटनात्मक नेते म्हणून ओळखले जातात. एनएसयूआयपासून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. पश्चिम महाराष्ट्र एनएसयूआयचे सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव, मावळ लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष तसेच पिंपरी-चिंचवड शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषविली(Pcmc Congress President) आहेत.
संघटन विस्तारासाठी त्यांनी राबविलेल्या मोहिमांची पक्षात विशेष चर्चा झाली होती. “चलो पंचायत अभियान”मध्ये महाराष्ट्रात उल्लेखनीय कामगिरी, अल्पावधीत १० हजारांहून अधिक युवा शक्ती कार्ड नोंदणी, तसेच शहरात ८० हून अधिक कॉर्नर सभा आयोजित करण्याचा अनुभव त्यांच्या नावावर आहे. त्यामुळे सक्रिय आणि मैदानात उतरून काम करणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले (Pcmc Congress President)जाते.
राजकीय जाणकारांच्या मते, काँग्रेसने पिंपरी-चिंचवडमध्ये नव्या पिढीला संधी देण्याचा प्रयत्न या नियुक्तीतून केला आहे. मात्र शहरातील गटबाजी थांबवणे, निष्क्रिय कार्यकर्त्यांना सक्रिय करणे, नव्या चेहऱ्यांना संधी देणे आणि स्थानिक प्रश्नांवर सातत्याने भूमिका घेणे या गोष्टींवरच बनसोडे यांच्या नेतृत्वाचे यश अवलंबून असणार (Pcmc Congress President)आहे.
दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून नरेंद्र बनसोडे यांच्या नियुक्तीचे स्वागत करण्यात येत असून आगामी काळात पक्ष पुन्हा संघटनात्मक ताकद उभी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात(Pcmc Congress President) आहे.
