पिंपरी (दि. १७ मार्च २०२६) : चिंचवडगाव येथील श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाच्या वतीने आयोजित पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवाची सुरुवात भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाली. या उत्सवातील पहिल्या दिवशी गायक व संगीतकार अवधूत गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या भक्ती-शक्तिगीतांच्या मैफलीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध (Swami Samarth Prakatdin) केले.
श्री स्वामी समर्थ मंदिर प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाला माजी नगरसेवक मधू जोशी, मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे-पाटील, उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, सचिव संजय आधवडे, खजिनदार गणपती फुलारी, सहसचिव मीनल देशपांडे यांच्यासह पदाधिकारी आणि भाविकांची उपस्थिती (Swami Samarth Prakatdin)होती.
‘अलंकापुरी ज्ञानभूमी पवित्र…’ या भक्तिरचनेने मैफलीची सुरुवात झाली. त्यानंतर ‘जय जय रामकृष्ण हरी…’ या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले. संत तुकाराम महाराजांच्या ‘रूप पाहता लोचनी…’ या अभंगाला श्रोत्यांनी टाळ्यांच्या गजरात ‘विठ्ठल-विठ्ठल’ असा प्रतिसाद दिला. ‘सुंदर ते ध्यान…’ आणि ‘काय सांगू देवा…’ या रचनांनी भक्तिरसाची उंची(Swami Samarth Prakatdin) वाढवली.
‘जिंकण्याचा मोह नाही, हरण्याचे भय नाही…’ या गीताला श्रोत्यांनी ‘श्री स्वामी समर्थ’ नामगजरासह उत्स्फूर्त दाद देत वन्स मोअरची मागणी केली. ‘हेचि येळ देवा…’ या अभंगातून भक्ती आणि शक्तीचा संगम अनुभवायला मिळाला. गोंधळ, भारूड या पारंपरिक सादरीकरणानंतर ‘आम्ही गड्या डोंगरचं राहणारं…’ आणि ‘देह विठ्ठल विठ्ठल झाला…’ या गीतांनाही भरभरून प्रतिसाद(Swami Samarth Prakatdin) मिळाला.

‘पावनखिंड’ चित्रपटातील ‘युगत मांडली…’ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन करणारे ‘रणी धाव तू मार्तंड…’ या गीतांमध्ये श्रोत्यांनी सामूहिक सहभाग नोंदवला. रंगलेल्या या मैफलीचा समारोप ‘स्वामींचे हे देणे…’ या भैरवीने (Swami Samarth Prakatdin) झाला.
या कार्यक्रमाला अभय नलगे (हार्मोनियम), पांडुरंग पवार (तबला), राजेंद्र बघे (मृदंग) यांच्यासह प्रसाद भांडवलकर, हेमंत क्षीरसागर, प्रतीक डोळस आणि विजय सोनवणे यांनी तालवाद्यात साथ(Swami Samarth Prakatdin) दिली.
दरम्यान, पहाटे पंचामृत अभिषेकाने प्रकटदिन उत्सवाची सुरुवात झाली. सकाळी उत्सव कलश स्थापना, आरती, मंडपपूजन, स्वामी स्वाहाकार, श्रीगुरुलीलाअमृत पारायण, महानैवेद्य तसेच माध्यान्ह व सायंआरती असे धार्मिक विधी पार पडले. दुपारी भजनसेवेत भाविकांनी सहभाग(Swami Samarth Prakatdin) घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास भैरट यांनी केले व आभार प्रदर्शनही त्यांनीच (Swami Samarth Prakatdin) केले.
