पिंपरी-चिंचवड शहरातील दळवीनगर परिसरात लग्नाचे आमिष दाखवून महिलेची तब्बल ३१ लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जयेश पाटील उर्फ आदर्श प्रशांत म्हात्रे याच्याविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला (Marriage Fraud ) आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने ‘शादी डॉट कॉम’ या मोबाईल ॲपच्या माध्यमातून फिर्यादी महिलेशी ओळख वाढवली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत तिचा विश्वास संपादन केला. पुढे विविध कारणे सांगत आरोपीने फिर्यादी महिलेला कर्ज काढण्यास प्रवृत्त केले आणि वेळोवेळी तिच्याकडून पैसे (Marriage Fraud ) घेतले.
या प्रकारात आरोपीने फिर्यादींकडून एकूण ३१ लाख २० हजार २५७ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास चिंचवड पोलीस करत (Marriage Fraud ) आहेत.
