चाकण : चाकण एमआयडीसीतील निघोजे–महाळुंगे मार्गावर शुक्रवारी (दि. १३) सकाळी प्रवाशांनी भरलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) च्या इलेक्ट्रिक बसला अचानक भीषण आग लागली. बसमध्ये सुमारे ५० कामगार प्रवास करत होते. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुखरूप बचावले असून मोठी जीवितहानी (Electric Bus Fire)टळली.

बस (क्र. MH 12 SF 1388) सकाळी सुमारे ८.४५ वाजता महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसमोरून जात असताना इंजिनकडून धूर निघू लागला. परिस्थितीची गंभीरता ओळखून चालकाने तत्काळ बस थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवले. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण बस जळून खाक( Electric Bus Fire) झाली.
प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत बस पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. या घटनेमुळे सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला (Electric Bus Fire) आहे.
