पिंपरी :भारतीय जनता पक्षात इतर पक्षातून आजी-माजी पदाधिकाऱ्यांना पक्षप्रवेश देण्यात आल्याने पिंपरी परिसरात भाजपमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात नव्याने २२ जणांचा प्रवेश झाल्यानंतर, या ‘आयाराम’ प्रवेशाविरोधात रविवारी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरून आत्मक्लेश आंदोलन( Pimpri BJP Entry)केले.
मुंबईत झालेल्या पक्षप्रवेशानंतर पिंपरीतील काही व्यक्तींनाही भाजपमध्ये प्रवेश दिल्याने स्थानिक निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी पिंपरीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते एकत्र जमले(Pimpri BJP Entry) होते.
या आंदोलनात परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, विविध सेवाभावी संस्था, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात( Pimpri BJP Entry)आली.
“आयारामांना थारा नको”, “निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय द्या” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त (Pimpri BJP Entry)केला.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी, “संदीपभाऊ वाघेरे जो निर्णय घेतील, त्या निर्णयास आम्ही ठाम पाठिंबा देऊ,” अशी भूमिका स्पष्ट (Pimpri BJP Entry) केली.
संदीप वाघेरे आक्रमक
आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना संदीप वाघेरे यांनी पक्ष नेतृत्वावर थेट आरोप(Pimpri BJP Entry) केले.
ते म्हणाले, “मी पैसे कमवण्यासाठी किंवा घर भरण्यासाठी राजकारणात आलो नाही. समाजातील उपेक्षित घटकांच्या विकासासाठी मी राजकारणात (Pimpri BJP Entry)आहे.”
काही व्यक्तींच्या पक्षप्रवेशाला आपण आधीच विरोध दर्शवला होता, तरीही त्यांचा प्रवेश देण्यात आल्याचे त्यांनी(Pimpri BJP Entry) सांगितले.
“आता माझी उमेदवारी कट करण्याचा डाव आखला जात आहे. आजपर्यंत मला अडचणीत आणण्याचे काम सातत्याने झाले आहे. हिंदुत्व हेच माझे डीएनए आहे. दगा-फटका करणाऱ्या मंडळींनी जनतेला फसवण्याचेच काम केले आहे,” असा आरोप त्यांनी (Pimpri BJP Entry)केला.
प्रभागातील विकासकामांचा उल्लेख करत वाघेरे यांनी पिंपळे सौदागर ब्रिज, रेल्वे उड्डाणपूल यांसह अनेक विकास प्रकल्पांना जाणीवपूर्वक विरोध करण्यात आल्याचा आरोप(Pimpri BJP Entry )केला.
“ज्यांनी प्रत्यक्ष विकासकामे केली, त्यांनाच बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असेही त्यांनी स्पष्ट (Pimpri BJP Entry)केले.
आक्रमक शैलीत बोलताना त्यांनी,“यांची वृत्ती अफजलखानाची असेल, तर मला शिवाजी महाराज व्हावे लागेल,” असे विधान करत उपस्थितांमध्ये जोश निर्माण केला.
नागरिकांना थेट आवाहन :नागरिकांना आवाहन करताना संदीप वाघेरे म्हणाले,
“लोकांची काम करणारे नगरसेवक निवडायचे की स्वतःचे हित साधणारे, हा निर्णय जनतेच्या हातात आहे. मला साथ द्या आणि माझ्यासोबत चार नगरसेवक निवडून द्या. केवळ पाच वर्षेच नव्हे, तर सदैव मी तुमच्यासोबत खंबीरपणे उभा (Pimpri BJP Entry)राहीन.”
या वक्तव्यामुळे पिंपरीतील राजकीय वातावरण अधिकच तापल्याचे चित्र दिसून आले असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाPimpri BJP Entry आहे.
