Home पुणे Kempo Karate Competition Bapu Katale:यशराज मार्शल आर्टतर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये जिल्हास्तरीय केंपो कराटे स्पर्धा संपन्न संकल्प सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष बापू कातळे यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव

Kempo Karate Competition Bapu Katale:यशराज मार्शल आर्टतर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये जिल्हास्तरीय केंपो कराटे स्पर्धा संपन्न संकल्प सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष बापू कातळे यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड :
यशराज मार्शल आर्ट या संस्थेच्या वतीने पिंपरी-चिंचवड स्पोर्ट्स कॅम्प असोसिएशनच्या अंतर्गत जिल्हास्तरीय केंपो कराटे स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत एकूण २५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेच्या प्रमुख पाहुणे म्हणून संकल्प सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय बापू कातळे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके प्रदान करण्यात आली.

या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड, देहूरोड आणि तळेगाव परिसरातील अनेक विद्यार्थी तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

स्पर्धेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष आणि शिक्षक नितीन वैरागर व धनश्री वैरागर यांनी केले. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी ओमकार लुमध्ये, यशराज आयशा सिंग, अर्निका काकडे, दिनेश दांगट, कीर्ती जयकुमार, अनन्या वेताळ, श्रेया राठोड, आलायना खेर आणि संदेश वैरागर या सर्व ब्लॅक बेल्ट विद्यार्थ्यांनी पंच म्हणून काम पाहिले.

कार्यक्रमादरम्यान काही पालकांनीही आपल्या भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. स्पर्धेच्या शेवटी विजेत्यांचा सत्कार करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00