पिंपरी (प्रतिनिधी):
पिंपरी परिसरात एका पानटपरीजवळ (Pantapri Crime News) दहशत निर्माण करण्याच्या हेतूने दोन व्यक्तींनी ‘आमच्याविरुद्ध तक्रार करणार काय, आम्ही इथले भाई आहोत’ असे धमकीचे शब्द उच्चारत एका तरुणावर तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी ३३ वर्षीय तरुणाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पिंपरी (Pantapri Crime News)पुलाखालील पानटपरीजवळ थांबले असताना आरोपी दोघे त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने फिर्यादीचा शर्ट धरत शिवीगाळ करत धमकी दिली – “आमच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करणार काय? आम्ही इथले भाई आहोत. आज तुला संपवून टाकू.”
त्यानंतर आरोपीने कमरेला लपवून ठेवलेली तलवार बाहेर काढून फिर्यादीच्या छातीवर वार केला. फिर्यादीने बचाव करण्याचा प्रयत्न केल्याने वार त्यांच्या डाव्या काखेजवळ लागून गंभीर दुखापत झाली. तोल जाऊन फिर्यादी खाली पडल्यावर आरोपीने पुन्हा तलवारीने पोटात वार करण्याचा प्रयत्न केला, पण तो चुकला आणि (Pantapri Crime News)फिर्यादीच्या डाव्या बरगडीस दुखापत झाली.
यानंतर आरोपींनी तलवार हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केली आणि घटनास्थळावरून फरार झाले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींच्या(Pantapri Crime News) शोधासाठी पथक तैनात केले असून, पुढील तपास सुरू आहे.

