Home गुन्हे PCMC Crime:भोसरीत तडीपार आरोपी कोयत्यासह आढळला, भोसरी पोलिसांची अटक कारवाई

PCMC Crime:भोसरीत तडीपार आरोपी कोयत्यासह आढळला, भोसरी पोलिसांची अटक कारवाई

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून तडीपार केलेला आरोपी रमीझ काझी भोसरी परिसरात कोयत्यासह आढळून आला. आदेशाचा भंग केल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी त्याला अटक केली.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून तडीपार करण्यात आलेल्या एका आरोपीने आदेशाचा भंग करत भोसरी परिसरात कोयता जवळ बाळगून खुलेआम वावर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी संबंधित आरोपीस अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रमीझ अल्ताफ काझी (वय ३४, रा. नूर मोहल्ला, दिघी रोड, भोसरी, पुणे) असे  (PCMC Crime)आहे.

ही कारवाई २२ रोजी रात्री गाव जत्रा मैदानाजवळ, भोसरी परिसरात करण्यात आली. आरोपीविरोधात महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १२२ तसेच आर्म्स अॅक्ट कलम ४/२५ आणि कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला  PCMC Crime आहे.

रमीझ अल्ताफ काझी याला ४ जुलै २०२५ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून दोन वर्षांसाठी, म्हणजेच २४ महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले होते. हा आदेश पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी दिला असून तो पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात लागू होता.

मात्र, तडीपार असतानाही आरोपी भोसरी परिसरात आढळून आल्याने त्याने आदेशाचा स्पष्ट भंग केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कोयत्यासह त्याला अटक केली.

या प्रकरणाचा पुढील तपास भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार ठेकणे करीत आहेत.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00