Home प्रेरणा / यशकथा Malharrao Holkar Jayanti:सांगवी विकास मंचतर्फे मल्हारराव होळकर जयंती उत्साहात साजरी

Malharrao Holkar Jayanti:सांगवी विकास मंचतर्फे मल्हारराव होळकर जयंती उत्साहात साजरी

सांगवी विकास मंचतर्फे मल्हारराव होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायणराव भागवत यांचे प्रेरणादायी व्याख्यान; अनेक मान्यवरांची उपस्थिती.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :सांगवी विकास मंचतर्फे मराठा साम्राज्याचा झेंडा अटकेपार नेणारे पराक्रमी सरदार मल्हारराव होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात (Malharrao Holkar Jayanti) आली.

 

या कार्यक्रमाचे आयोजन मंचाचे अध्यक्ष श्री महेशशेठ भागवत यांनी केले होते. कार्यक्रमात मल्हारराव होळकर यांच्या जीवनावर चरित्रपर व्याख्यान देण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री नारायणराव भागवत हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित (Malharrao Holkar Jayanti) होते.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर अहिल्यादेवी सेवा संघाचे माजी अध्यक्ष अभिमन्यू गाडेकर यांनी प्रास्ताविक करत मल्हारराव होळकर यांना अभिवादन(Malharrao Holkar Jayanti) केले.

 

प्रमुख वक्ते श्री नारायणराव भागवत यांनी आपल्या व्याख्यानात मल्हारराव होळकर यांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी प्रसंग उलगडले. मराठा साम्राज्याचा विस्तार पंजाब, पेशावरपर्यंत नेण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इंदूर संस्थानचा कारभार त्यांनी आपल्या सूनबाई अहिल्याबाई होळकर यांच्या हाती दिला आणि त्यांनी तो अत्यंत उत्तम प्रकारे सांभाळल्याचेही त्यांनी नमूद (Malharrao Holkar Jayanti) केले.

 

या कार्यक्रमाला अहिल्यादेवी सेवा संघाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब चितळकर, माजी कार्यकारी अध्यक्ष मनोजकुमार मारकड, माजी सदस्य कृष्णकांत गिरगुणे, साहित्यिक मुरलीधर दळवी, सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष दिलीप फाकटकर, भरत कुंभार, आण्णासाहेब कुंभार, श्री नगरकर आदी मान्यवर उपस्थित (Malharrao Holkar Jayanti)होते.

 

कार्यक्रमाच्या शेवटी कृष्णकांत गिरगुणे यांनी उपस्थितांचे आभार (Malharrao Holkar Jayanti)मानले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00