निगडी (प्रतिनिधी) : समाज प्रबोधनाचा हेतू डोळ्यासमोर ठेवून स्थापन करण्यात आलेल्या ‘अनुसंधान कला संस्था’चा उद्घाटन समारंभ रविवारी, दि. ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ८.३० या वेळेत निगडी येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘रुद्रंग’ संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम होत असून, विविध मान्यवरांची उपस्थिती या वेळी लाभणार (Suresh Kokil) आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे प्रतिनिधी तथा विरोधी पक्षनेते मा. भाऊसाहेब भोईर हे असणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे आमदार मा. अमित गोरखे उपस्थित राहणार असून, उद्घाटक म्हणून माजी नगरसेवक मा. रमेश शिंदे (वाशी, मुंबई) कार्यभार स्वीकारणार(Suresh Kokil) आहेत.
यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर मा. शर्मिलाताई बाबर, नगरसेविका मा. शैलजाताई मोरे, नगरसेवक मा. राजू मिसाळ, मा. अमित गावडे तसेच चित्रपट निर्माते-दिग्दर्शक मा. गणेश शिंदे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार (Suresh Kokil) आहेत.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रख्यात नाटककार, कवी, दिग्दर्शक आणि नेपथ्यकार मनस्वी कलावंत मा. सुरेश कोकीळ यांची प्रकट मुलाखत होय. ज्येष्ठ साहित्यिक व सूत्रसंचालक मा. श्रीकांत चौगुले तसेच नाट्य-चित्रपट अभिनेते मा. संदीप साकोरे हे मुलाखतकार म्हणून संवाद साधणार(Suresh Kokil) आहेत.
तसेच प्रदेशाध्यक्ष मा. अनुप मोरे, सचिव राजेंद्र बाबर, माजी महापौर मा. आर.एस. कुमार, सामाजिक कार्यकर्ते मा. अप्पा बागल, मा. सलिम शिकलगार आणि मा. बाळा शिंदे यांची विशेष उपस्थिती राहणार(Suresh Kokil) आहे.
हा कार्यक्रम सेक्टर २४ येथील ‘भरतमुनी रंगमंच’, कामायनी प्रशाला, चिंतामणी मंदिराशेजारी, प्राधिकरण, निगडी येथे पार पडणार(Suresh Kokil) आहे.
या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक रमेश वाकनीस बाळासाहेब विभुते माधुरी ओकआणि सहकाऱ्यांनी केले (Suresh Kokil) आहे.
