Home गुन्हे MCOCA Accused Arrested:मोका गुन्ह्यातील 10 महिन्यांपासून फरार आरोपीला अटक; गुन्हे शाखा युनिट 01 ची कामगिरी

MCOCA Accused Arrested:मोका गुन्ह्यातील 10 महिन्यांपासून फरार आरोपीला अटक; गुन्हे शाखा युनिट 01 ची कामगिरी

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 01 ने 10 महिन्यांपासून फरार असलेल्या मोका गुन्ह्यातील आरोपीला अटक केली. निगडी परिसरात पोलिसांची यशस्वी कारवाई.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड : गुन्हे शाखा युनिट 01 ने उल्लेखनीय कामगिरी करत मोका (MCOCA) अंतर्गत नोंद असलेल्या गुन्ह्यातील 10 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक केली (MCOCA Accused Arrested) आहे.

 

दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी रात्री सांगवी, दापोडी आणि संत तुकारामनगर पोलीस ठाणे हद्दीत रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी आणि रात्रगस्त सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार निगडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक 273/2026 मधील आरोपी शाहनवाज ऊर्फ शान्या मुस्ताक शेख (वय 23, रा. भिम क्रांतीनगर, निगडी, पुणे) हा पिंपरी परिसरात असल्याची खात्री (MCOCA Accused Arrested)पटली.

 

त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून 2 एप्रिल 2026 रोजी पहाटे 1.15 वाजता डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलजवळून आरोपीला ताब्यात घेतले. अटकेनंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली (MCOCA Accused Arrested)आहे.

 

सदर आरोपीवर भारतीय न्याय संहिता 2023 तसेच भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA) अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत.

 

आरोपीला पुढील तपासासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली निगडी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले (MCOCA Accused Arrested)आहे.

 

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जयवंत राऊत, पोलीस शिपाई तेजस भालचिम, विजय जानराव आणि सोहेल चिखलकर यांनी यशस्वीरीत्या पार (MCOCA Accused Arrested)पाडली.

 

पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात (MCOCA Accused Arrested)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00