प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. हिंजवडी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने वाकड परिसरात कारवाई करत एम.डी. (मेफेड्रोन) ड्रग्जसह दोन तस्करांना अटक (Hinjewadi Police) केली.
गुप्त माहितीच्या आधारे विनोदे वस्ती येथे सापळा रचून पोलिसांनी संशयित कार अडवली. तपासणीदरम्यान वाहनातून ४२ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज आढळून आले. यावेळी अतुल शंकर बालगुडे (वय ३५) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ड्रग्ज व कार असा मुद्देमाल जप्त करण्यात(Hinjewadi Police) आला.
या तपासादरम्यान गुन्ह्याचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचले. त्यानुसार गोवंडी येथून शाहरुख उर्फ सद्दाम अन्सारी याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून २०० ग्रॅम एम.डी. ड्रग्ज जप्त करण्यात (Hinjewadi Police)आले.
या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी एकूण सुमारे २७ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलिसांनी ही कारवाई करत अमली पदार्थांच्या जाळ्यावर मोठा आघात केला असून पुढील तपास सुरू (Hinjewadi Police)आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी आणि पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) ऋषीकेश घाडगे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे. अमली पदार्थांच्या या जाळ्याचा अधिक तपास आता हिंजवडी पोलीस करत (Hinjewadi Police )आहेत.
