प्रतिनिधी :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये तब्बल १ कोटी १० लाख ६० हजार ४२१ रुपयांचा सेवाकर वसूल करत विक्रमी कामगिरी केली आहे. गेल्या पाच वर्षांतील ही सर्वाधिक वसुली ठरली(PCMC Tax Collection) आहे.
महापालिकेच्या नियोजनबद्ध मोहिमा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि ऑनलाइन-ऑफलाइन सुलभ सुविधा यामुळे ही कामगिरी शक्य झाली. नागरिकांच्या सोयीसाठी मार्च महिन्यात सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवण्यात आले (PCMC Tax Collection) होते.
महापौर रवि लांडगे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही वसुली मोहीम राबवण्यात आली. नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे महसुलात मोठी वाढ झाल्याचे प्रशासनाने (PCMC Tax Collection) सांगितले.
यापूर्वीच्या वर्षांच्या तुलनेत यंदाची वसुली दुपटीहून अधिक झाली असून शहराच्या विकासात नागरिकांनी दिलेला सहभाग महत्त्वाचा असल्याचेही अधिकाऱ्यांनी नमूद केले. पुढील काळातही महसूल वाढवण्यासाठी अशाच सुलभ सेवा देण्यावर महापालिका भर देणार (PCMC Tax Collection) आहे.
