पिंपरी : अखिल भारतीय अधिवक्ता परिषद, पुणे जिल्हा व पिंपरी-चिंचवड जिल्ह्याच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी प्राधिकरण येथे अधिवक्ता महिला संमेलन उत्साहात पार पडले. यावेळी ‘सद्यस्थितीतील वाढत्या घटस्फोटांची मीमांसा’ या विषयावर मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्षा ॲड. नीलिमा गोखले यांनी विवाहसंस्था टिकवण्यासाठी समुपदेशनाची गरज व्यक्त (Women Conference) केली.
त्या म्हणाल्या, अनिर्बंध वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी घटस्फोट घेणे चुकीचे असून त्यामुळे विवाहसंस्था धोक्यात येत आहे. पती-पत्नीतील किरकोळ मतभेद संवाद आणि समजुतीने सोडवणे आवश्यक आहे. नवविवाहित दाम्पत्यांचे समुपदेशन केल्यास अनेक कौटुंबिक वाद टाळता येऊ शकतात, असे त्यांनी (Women Conference)सांगितले.
कार्यक्रमास उपमहापौर शर्मिला बाबर, ज्येष्ठ समुपदेशिका डॉ. शिवलीला पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सतीश गोरडे, ॲड. अंतरा देशपांडे, ॲड. संतोष गुरव, ॲड. अमेय पिंगळे, नरेंद्र पेंडसे आदी मान्यवर उपस्थित(Women Conference) होते.

डॉ. शिवलीला पाटील यांनी ‘प्राचीन भारतातील महिलांचे योगदान व सद्यस्थिती’ या विषयावर मार्गदर्शन करताना राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या कार्याचा गौरव(Women Conference) केला.
दीपप्रज्वलन आणि सांघिक गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालन ॲड. श्वेता चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲड. प्रणिता कुलकर्णी व ॲड. बोधनी यांनी (Women Conference)मानले.
