(निगडी, दि. ८ सप्टेंबर २०२६ ): निगडी प्राधिकरण येथील महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर प्रस्तावित असलेले महापौर निवासस्थान शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारावे. निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्पाजवळील जागा शिवजयंतीसह विविध सार्वजनिक उपक्रमांसाठी राखून ठेवावी, अशी आग्रही मागणी भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समितीसह शहरातील शिवप्रेमी संघटना व नागरिकांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला (Mayor Residence Nigdi)आहे.
निगडी प्राधिकरण येथील महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर महापौर निवासस्थान उभारण्यासाठी नुकत्याच झालेल्या महापालिका व स्थायी समितीच्या सभेत पाच कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून भक्ती शक्ती शिवजयंती महोत्सव समिती, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य महानाट्य तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले (Mayor Residence Nigdi)जाते.
याशिवाय विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमही याच ठिकाणी आयोजित केले जातात. भक्ती-शक्ती समूह शिल्पाजवळ उपलब्ध असलेली ही एकमेव मोठी सार्वजनिक जागा असून, परिसरात अन्य पर्यायी जागा उपलब्ध नसल्याचा दावा समितीने केला आहे. त्यामुळे सदर जागा सार्वजनिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी कायमस्वरूपी राखून ठेवावी, अशी मागणी करण्यात आली(Mayor Residence Nigdi) आहे.
याबाबत शिवप्रेमी संघटना व नागरिकांच्या वतीने महापौर रवी लांडगे, महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आणि शहर अभियंता मनोज सेठिया यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले. महापौर निवासस्थानासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात पर्यायी जागेची निवड करावी, अशी विनंती यावेळी करण्यात (Mayor Residence Nigdi)आली.
या निवेदनावर मारुती भापकर, सचिन चिखले, चेतन पवार, प्रकाश जाधव, काशिनाथ नखाते, रोहिदास शिवणेकर, हौशेराव शिंदे, प्रबुद्ध कांबळे, सतीश काळे, वैभव जाधव, वसंत पाटील, सखाराम इक्के, आबासाहेब ढवळे आदींच्या स्वाक्षऱ्या (Mayor Residence Nigdi)आहेत.


