Home माझं पिंपरी चिंचवड Annasaheb Magar:कै.अण्णासाहेब मगर यांच्या नावाने दापोडी–निगडी हमरस्त्याचे नामकरण

Annasaheb Magar:कै.अण्णासाहेब मगर यांच्या नावाने दापोडी–निगडी हमरस्त्याचे नामकरण

पिंपरी-चिंचवडचे शिल्पकार कै. खासदार अण्णासाहेब मगर यांच्या स्मरणार्थ दापोडी ते निगडी मुख्य रस्त्याचे 'कै. खासदार अण्णासाहेब मगर हमरस्ता' असे नामकरण करण्यात आले. महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण.

by Admin
Spread the love

पिंपरी, दि. ३० जून २०२६ : पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाचा भक्कम पाया रचणारे, नगरीचे शिल्पकार, माजी नगराध्यक्ष तथा माजी खासदार कै. अण्णासाहेब मगर यांच्या स्मरणार्थ दापोडी ते निगडी या प्रमुख रस्त्याला ‘कै. खासदार अण्णासाहेब मगर हमरस्ता’ असे नाव देण्यात आले. दापोडी येथे आयोजित कार्यक्रमात या नामफलकाचे अनावरण पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात (Annasaheb Magar)आले.

 

यावेळी बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले, “आज आपण ज्या वैभवशाली पिंपरी-चिंचवड शहराचा अभिमान बाळगतो, त्या शहराच्या विकासाचे स्वप्न कै. अण्णासाहेब मगर यांनी दूरदृष्टीने पाहिले आणि त्याची पायाभरणी केली. त्यांच्या स्मरणार्थ शहरातील प्रमुख रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आल्याने भावी पिढ्यांना त्यांच्या कार्याची प्रेरणा आणि ओळख (Annasaheb Magar)मिळेल.”

 

ते पुढे म्हणाले, “नगराध्यक्ष, आमदार आणि पुढे खासदार म्हणून जबाबदाऱ्या सांभाळताना अण्णासाहेब मगर यांनी हडपसर, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई असा अत्यंत कष्टाचा प्रवास करत शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्या काळात त्यांनी आखलेले १०० मीटर रुंद रस्त्यांचे नियोजन आणि औद्योगिक विकासाचा दूरदर्शी आराखडा आजच्या आधुनिक पिंपरी-चिंचवडचा मजबूत पाया ठरला (Annasaheb Magar)आहे.”

 

या कार्यक्रमाला शहर सुधार समितीचे सभापती संजय काटे, नगरसदस्य ॲड. नितीन लांडगे, राजू बनसोडे, नगरसदस्या माई काटे, प्रतीक्षा जवळकर, श्रुती वाकडकर, ज्येष्ठ इतिहासकार डॉ. राजा दीक्षित, सहशहर अभियंता मनोज सेठिया, उपआयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय काशिद, उपअभियंता संतोष कुदळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, डॉ. सीमा काळभोर, बापू गायकवाड तसेच विविध क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित (Annasaheb Magar) होते.

 

दरम्यान, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी यापूर्वी एका कार्यक्रमात कै. अण्णासाहेब मगर यांच्या कार्याचा गौरव करत शहरातील प्रमुख रस्त्याला त्यांचे नाव देण्याची संकल्पना मांडली होती. त्या संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त (Annasaheb Magar)केले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00