Home माझं पिंपरी चिंचवड Inner Wheel Club Nigdi pride :पोस्टमनांचा सन्मान; इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडकडून 20 पोस्टमनांना रेनकोट वाटप

Inner Wheel Club Nigdi pride :पोस्टमनांचा सन्मान; इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडकडून 20 पोस्टमनांना रेनकोट वाटप

निगडी प्राधिकरण पोस्ट कार्यालयात इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या वतीने 20 पोस्टमनांचा सन्मान करून रेनकोट वाटप करण्यात आले. पावसाळ्यात सुरक्षित सेवा बजावण्यासाठी हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.

by Admin
Spread the love

(पिंपरी प्रतिनिधी ): इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या वतीने निगडी प्राधिकरण पोस्ट कार्यालयात समाजोपयोगी सेवा प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले. सर्व प्रकारच्या हवामानात निष्ठेने पत्रे आणि पार्सल नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या पोस्टमनांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात (Inner Wheel Club Nigdi Pride )आला.

या प्रकल्पांतर्गत पावसाळ्यात पोस्टमनांना सुरक्षित आणि सोयीस्करपणे सेवा बजावता यावी, यासाठी २० पोस्टमनांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. त्यांच्या अथक सेवाभावाचा सन्मान करण्याचा हा छोटासा प्रयत्न इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या वतीने करण्यात (Inner Wheel Club Nigdi Pride )आला.

हा प्रकल्प क्लबच्या १० सदस्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून यशस्वीरीत्या पार पडला. यामध्ये अध्यक्ष दिपाली जाधव, सचिव ॲड. आरती जाधव, खजिनदार डॉ. स्वाती देशमुख, एडिटर वर्षा भोईटे, माजी अध्यक्षा प्रणिता अलूरकर तसेच सुजाता ढमाले, सोनाली जयंत, वैशाली जोशी, प्रीती आचार्य आणि सुरेखा उटगे यांनी सहभाग (Inner Wheel Club Nigdi Pride )नोंदविला.

समाजासाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या अत्यावश्यक सेवकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम अर्थपूर्ण (Inner Wheel Club Nigdi Pride )ठरला.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00