Home माझं पिंपरी चिंचवड Mayor Medical Assistance:पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे उद्घाटन; गरजू रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ

Mayor Medical Assistance:पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे उद्घाटन; गरजू रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ

पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. आयुष्मान भारत, महात्मा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि महापौर सहाय्यता निधीचा लाभ आता पात्र नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

by Admin
Spread the love

(पिंपरी, प्रतिनिधी दि. २२ जुलै) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सर्वसामान्य नागरिकांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे उद्घाटन आयुष्मान भारत योजनेचे महाराष्ट्र राज्य प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते करण्यात (Mayor Medical Assistance)आले.

 

या कक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महापौर सहाय्यता निधी, आयुष्मान भारत योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना यांचा लाभ पात्र नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उपचारासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, अर्ज प्रक्रिया, संबंधित रुग्णालयांशी समन्वय तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी या कक्षामार्फत मार्गदर्शन केले जाणार (Mayor Medical Assistance) आहे.

 

पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक आणि कामगारनगरी असल्याने अनेक कुटुंबांना गंभीर आजारांच्या उपचारासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र रुग्णांना पाच लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला (Mayor Medical Assistance)आहे.

 

रुग्णालयात दाखल होण्यापासून ते उपचार पूर्ण होईपर्यंत आवश्यक मार्गदर्शन, कागदपत्रांची पूर्तता आणि समन्वयासाठी दोन आरोग्यमित्रांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली असून, भविष्यात गरजेनुसार या सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी मनोज शिंदे (८४१२९९५५९९), अभिजित पानखेडे (९११२४०४१८१) यांच्याशी संपर्क साधावा किंवा टोल-फ्री हेल्पलाईन १८०० २३३ २२‍०० वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले (Mayor Medical Assistance) आहे.

 

यावेळी डॉ. ओमप्रकाश शेटे म्हणाले की, राज्यातील सुमारे ४,८०० हून अधिक शासकीय आणि खासगी रुग्णालये आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनांशी संलग्न आहेत. पात्र नागरिकांना वेळेत कॅशलेस उपचार मिळावेत, यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असून या योजनांबाबत अधिकाधिक जनजागृती होणे आवश्यक(Mayor Medical Assistance) आहे.

 

महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, शहरातील कोणताही नागरिक केवळ आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्ष नागरिक आणि शासन यांच्यातील प्रभावी दुवा ठरेल. पात्र रुग्णांना वेळेत उपचार आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी या कक्षामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले(Mayor Medical Assistance) जाईल.

 

यावेळी आमदार, उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी पठारे, नगरसदस्य शत्रुघ्न काटे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे तसेच विविध पदाधिकारी, महापालिका अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित (Mayor Medical Assistance) होते.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00