Home गुन्हे Absconding Accused Arrested:”दहा वर्षांपासून फरार असलेला बलात्कार व पॉक्सो प्रकरणातील आरोपी अखेर जेरबंद; कर्नाटकातून पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई”

Absconding Accused Arrested:”दहा वर्षांपासून फरार असलेला बलात्कार व पॉक्सो प्रकरणातील आरोपी अखेर जेरबंद; कर्नाटकातून पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई”

निगडी पोलीस ठाण्यातील बलात्कार व पॉक्सो प्रकरणात गेल्या १० वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने कर्नाटकातून अटक केली. गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

by Admin
Spread the love

(पिंपरी, दि. २२ जुलै ): निगडी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या बलात्कार आणि पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गतच्या गंभीर गुन्ह्यात गेल्या दहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने कर्नाटकातून अटक केली (Absconding Accused Arrested)आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव हनुमंत दुर्गाप्पा कुऱ्हाडे (वय ३४, रा. मधू रायरपूरा, जि. हावेरी, कर्नाटक; मूळ रा. ओटास्कीम, निगडी) असे (Absconding Accused Arrested )आहे.

निगडी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ७२६/२०१६ (भा.दं.वि. कलम ३७६ तसेच पॉक्सो कायद्यातील संबंधित कलमे) मधील आरोपी कर्नाटकात वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार रमेश मावसकर यांना मिळाली (Absconding Accused Arrested )होती.

त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील कानगुडे यांनी संबंधित मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून आरोपी कुरागुंड (ता. राणेबेन्नूर, जि. हावेरी, कर्नाटक) येथे असल्याची खात्री (Absconding Accused Arrested ) पटली.

यानंतर पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथक कर्नाटकला रवाना झाले. पथकाने कुरागुंड येथे सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात (Absconding Accused Arrested )आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील कानगुडे, पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड तसेच पोलीस अंमलदार रमेश मावसकर, भूपेंद्र चौधरी आणि निलेश जाधव यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार (Absconding Accused Arrested )पाडली.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00