पिंपरी-चिंचवड :निगडी पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या जिवे मारण्याच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यात तीन महिन्यांपासून फरार असलेल्या नाव निष्पन्न आरोपीला गुन्हे शाखा युनिट–०१च्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले असून, ही कारवाई कौतुकास्पद ठरत (Crime Branch Unit 01) आहे.
निगडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ४९९/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ११८(१), ११५(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट–०१कडून सुरू असताना पोलीस शिपाई २८९२ सोहेल चिखलकर यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फरार आरोपीचा ठावठिकाणा निश्चित (Crime Branch Unit 01) करण्यात आला.
त्यानुसार क्रीस्तोफर ऊर्फ क्रिश्या ऑलविन सलढाणा (वय २१, व्यवसाय – रिक्षा मेकॅनिक, रा. आझाद चौक, शंकराचे मंदिरामागे, ए/डब्ल्यू बिल्डिंग, ओटास्किम, निगडी, पुणे) या आरोपीला देहुगाव येथील गाथा हॉस्पिटल परिसरात सापळा रचून अटक करण्यात (Crime Branch Unit 01)आली.
ही कारवाई गुन्हे शाखा युनिट–०१चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषक पोलीस हवालदार १६०३ देवा राऊत, ८३२ जयवंत राऊत, २९२९ विजय शेळकंदे, पोलीस शिपाई २८९२ सोहेल चिखलकर, २०९७ उद्धव खेडकर आणि २८३१ संदेश देशमुख यांच्या पथकाने यशस्वीरीत्या (Crime Branch Unit 01) पार पाडली.
तपासादरम्यान आरोपीने निगडी पोलीस स्टेशन हद्दीत सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी निगडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले (Crime Branch Unit 01)आहे.
गुन्हे शाखा युनिट–०१च्या या तत्पर व अचूक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, पोलीस दलाच्या कार्यक्षमतेबद्दल प्रशंसा होत (Crime Branch Unit 01) आहे.
https://youtube.com/watch?v=5W-VsDyqfMk&si=EwGMTyiZiyj0Lnoy
