Home गुन्हे Chinchwad Crime News:09 वर्षांपासून फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट 01 कडून अटक

Chinchwad Crime News:09 वर्षांपासून फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट 01 कडून अटक

कर्जत पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यावर गोळीबार करून फरार झालेल्या आकाश ऊर्फ अक्षय बाजीराव गायकवाड याला गुन्हे शाखा युनिट 01 ने चिंचवडमध्ये अटक केली.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : कर्जत पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथील पोलीस कर्मचाऱ्यावर पिस्टलमधून गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तब्बल 09 वर्षांपासून फरार असलेल्या पाहिजे आरोपीला गुन्हे शाखा युनिट 01 ने ताब्यात घेतले. आरोपी दुसऱ्या एका चोरीच्या गुन्ह्यातही फरार असल्याचे उघड झाले (Chinchwad Crime News) आहे.

 

गुन्हे शाखा युनिट 01 चे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस हवालदार 832 जयवंत राऊत आणि 1603 देवा राऊत हे चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी कर्जत पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. 200/2017 भा.द.वि. कलम 307, 353, 427 तसेच आर्म अॅक्ट 3 (25) मधील पाहिजे आरोपी आकाश ऊर्फ अक्षय बाजीराव गायकवाड (वय 27, व्यवसाय फ्लेक्स प्रिटिंग, सध्या रा. स्वरा फ्लेक्स प्रिटिंग, जुना जकात नाका, चिंचवडगाव, मूळ रा. भाऊसाहेबनगर, मिरजगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) हा पिंपरी-चिंचवड परिसरात वास्तव्य करत असल्याची गोपनीय माहिती (Chinchwad Crime News)मिळाली.

 

पोलीस हवालदार देवा राऊत व जयवंत राऊत यांनी मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचा मोबाईल क्रमांक मिळवून तांत्रिक विश्लेषणाद्वारे ठावठिकाणा शोधण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली(Chinchwad Crime News) दिली.

 

तपासादरम्यान आरोपी हा कर्जत पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. 199/2017 भा.द.वि. कलम 379 मधीलही पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला पोलीस उपनिरीक्षक सचिन भाबड व कर्जत पोलीस स्टेशनच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले(Chinchwad Crime News) आहे.

 

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात (Chinchwad Crime News) आली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00