Home प्रेरणा / यशकथा IWC Nigdi Pride:बारामतीत IWC Nigdi Pride चा सामाजिक उपक्रम; वारकरी महिलांना 60 साड्या व उपयुक्त पिशव्यांचे वाटप

IWC Nigdi Pride:बारामतीत IWC Nigdi Pride चा सामाजिक उपक्रम; वारकरी महिलांना 60 साड्या व उपयुक्त पिशव्यांचे वाटप

जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक 238 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर' मधील 60 महिला वारकऱ्यांना IWC Nigdi Pride च्या वतीने उपयुक्त पिशव्या व साड्यांचे वितरण करण्यात आले.

by Admin
Spread the love

(निगडी,प्रतिनिधी):जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक २३८ “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर” या दिंडीतील महिला वारकऱ्यांसाठी इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईड (IWC Nigdi Pride) यांच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. बारामती येथील मुक्कामादरम्यान १५ जुलै रोजी महिला वारकऱ्यांना उपयुक्त अशा क्लबच्या जनजागृती संदेशासह कापडी पिशव्यांचे तसेच साड्यांचे वितरण करण्यात (IWC Nigdi Pride) आले.

या उपक्रमासाठी क्लबच्या अध्यक्षा दीपाली जाधव यांनी नियोजनाची जबाबदारी सांभाळली, तर सदस्या सुवर्णा जांभळकर यांनी विशेष पुढाकार घेतला. क्लबच्या वतीने एकूण ६० उपयुक्त पिशव्यांचे वितरण करण्यात आले. तसेच सुवर्णा जांभळकर यांनी स्वतःच्या वतीने दिंडीतील ६० महिला वारकऱ्यांना सुंदर साड्यांची भेट (IWC Nigdi Pride)दिली.

हा उपक्रम मूळतः निगडी येथे आयोजित करण्याचे नियोजन होते. मात्र, यंदा दिंडीला तेथे येण्यास परवानगी न मिळाल्याने पालखीचा मार्ग बदलला. त्यामुळे काही दिवस दिंडीशी संपर्क साधणे शक्य झाले नाही. अखेर बारामती येथे दिंडी मुक्कामाला आल्यानंतर योग्य समन्वय साधत अध्यक्षा दीपाली जाधव आणि सुवर्णा जांभळकर यांनी हा सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण(IWC Nigdi Pride) केला.

या उपक्रमात क्लबच्या नूतन सदस्यांनीही उत्साहाने सहभाग घेत सामाजिक बांधिलकी जपली. महिला वारकऱ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार (IWC Nigdi Pride) मानले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00