पिंपरी, दि. १६ फेब्रुवारी २०२६: “छत्रपती शिवाजी महाराज की जय… जय भवानी, जय शिवाजी” या जयघोषात आणि वाद्यांच्या दणदणाटात निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प परिसर शिवमय झाला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६ चा दिमाखदार शुभारंभ ‘शिवशंभो गर्जना’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने (Shivshambho Garjana) झाला.
१५ ते १९ फेब्रुवारी दरम्यान शहरात विविध ठिकाणी या प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर व अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उद्घाटन माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते (Shivshambho Garjana)झाले.
अंबेजोगाई येथील सुप्रसिद्ध कलाकार अभिजीत जाधव व आमु जाधव यांनी सादर केलेल्या ‘शिवशंभो गर्जना’ कार्यक्रमात पहाडी आवाजातील पोवाडे, शाहिरी, गवळणी व भारूड यांद्वारे शिवरायांचा पराक्रम आणि विचारांचा वारसा जिवंत करण्यात आला. या कलाविष्काराला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद(Shivshambho Garjana) मिळाला.
दरम्यान, १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान निगडी येथील नियोजित महापौर निवास परिसरात ‘शिवगर्जना’ या भव्य महानाट्याचे सादरीकरण होणार आहे. सुमारे २५० हून अधिक कलाकार, घोडे-उंट, आकर्षक नेपथ्य, प्रकाश व ध्वनी संयोजनाच्या माध्यमातून शिवचरित्रातील महत्त्वपूर्ण प्रसंग उभे केले जाणार आहेत. या महानाट्याचा शुभारंभ १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते होणार (Shivshambho Garjana) आहे.
