Home आरोग्य Chinchwad Fire:चिंचवडच्या भाटनगरमध्ये अॅक्रिलिक दुकानाला आग; अग्निशमन दलाने आणली नियंत्रणात

Chinchwad Fire:चिंचवडच्या भाटनगरमध्ये अॅक्रिलिक दुकानाला आग; अग्निशमन दलाने आणली नियंत्रणात

चिंचवडच्या भाटनगर परिसरातील अॅक्रिलिक दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाने वेळीच आग नियंत्रणात आणली; जीवितहानी टळली.

by Admin
Spread the love

पिंपरी, दि. १६ फेब्रुवारी २०२६: चिंचवड येथील भाटनगर परिसरात सायंकाळी सुमारे पावणे सहाच्या सुमारास एका अॅक्रिलिक दुकानाला आग लागली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात (Chinchwad Fire) आणली.

थेरगाव, नेहरूनगर उपकेंद्र तसेच मुख्य अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना करण्यात आल्या होत्या. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला (Chinchwad Fire)आहे.

या आगीत दुकान पूर्णतः जळून मोठे आर्थिक नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नागरिकांनी विद्युत उपकरणांची सुरक्षितता राखावी व आपत्कालीन परिस्थितीत १०१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अग्निशमन विभागाने केले (Chinchwad Fire) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00