Home गुन्हे Vehicle Theft Case:संत तुकारामनगर पोलिसांची मोठी कारवाई; सराईत वाहन चोरट्या अटकेत, ११ दुचाकी जप्त

Vehicle Theft Case:संत तुकारामनगर पोलिसांची मोठी कारवाई; सराईत वाहन चोरट्या अटकेत, ११ दुचाकी जप्त

संत तुकारामनगर पोलिसांनी वाहन चोरीविरोधात मोठी कारवाई करत संतोष घारे या सराईत चोरट्याला अटक केली. आरोपीकडून ५.९५ लाख रुपये किमतीच्या ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, एकूण ९ गुन्हे उघडकीस आले. सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून सापळा रचत ही कारवाई करण्यात आली. ही मोहीम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :संत तुकारामनगर पोलिसांनी वाहन चोरीच्या घटनांवर मोठी कारवाई करत एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल ५ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, यामुळे विविध पोलिस ठाण्यांतील नऊ गुन्हे उघडकीस आले (Vehicle Theft Case) आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संतोष शिवराम घारे (वय ४४, रा. ओझर्डे, ता. मावळ) असे आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यातून एक संशयित व्यक्ती ओळखण्यात (Vehicle Theft Case)आली.

दरम्यान, शहर परिसरासह मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे आणि वडगाव मावळ भागात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. यामुळे पोलिसांनी विशेष पाळत ठेवत सापळा रचला आणि अखेर आरोपीला ताब्यात(Vehicle Theft Case) घेतले.

या कारवाईमुळे संत तुकारामनगर, सहकारनगर, महाळुंगे एमआयडीसी, आळंदी, सांगवी आणि तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्ह्यांचा उलगडा झाला(Vehicle Theft Case) आहे.

ही यशस्वी कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड व बसवराज तेली, उपायुक्त संदीप आटोळे, सहायक आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास आव्हाड, पोलिस निरीक्षक गोरख कुंभार तसेच त्यांच्या पथकाने ही कामगिरी (Vehicle Theft Case)बजावली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00