Home आरोग्य Unit 1 Action:चिंचवडमध्ये धक्कादायक घटना: कामगाराला तिसऱ्या मजल्यावरून ढकलून हत्या

Unit 1 Action:चिंचवडमध्ये धक्कादायक घटना: कामगाराला तिसऱ्या मजल्यावरून ढकलून हत्या

गुन्हे शाखेची तात्काळ कारवाई, आरोपी ताब्यात

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड परिसरात बांधकाम साईटवरून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. घर दुरुस्तीच्या कामादरम्यान दोन कामगारांमध्ये झालेल्या वादातून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणात गुन्हे शाखा युनिट १ ने तत्पर कारवाई करत आरोपीला अटक केली (Unit 1 Action) आहे.

 

दिनांक २९ मार्च २०२६ रोजी चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीत वाल्हेकरवाडी येथील अर्थव पार्क परिसरात, ममिली मंगल कार्यालयाजवळ श्री. सतीश शिंदे यांच्या घराचे दुरुस्तीचे काम सुरू होते. यावेळी कामगार पुनीत रामनक्षत्र शुक्ला (वय २८) आणि केशवकुमार मोहन महातो (वय २९) हे दोघे तिसऱ्या मजल्यावर काम करत होते. किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि तो अचानक हिंसक स्वरूप धारण करत मारहाणीपर्यंत (Unit 1 Action)पोहोचला.

 

या दरम्यान आरोपी पुनीत शुक्ला याने केशवकुमार महातो याला जोराचा धक्का दिल्याने तो थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. या भीषण घटनेत केशवकुमार यांचा जागीच मृत्यू(Unit 1 Action) झाला.

घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट १ चे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्तात्रय गुळीग, पोलीस हवालदार जयवंत राऊत आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू (Unit 1 Action)केला.

 

दरम्यान, गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली गार्डन परिसरात लपल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून आरोपीचा पाठलाग केला आणि त्याला घरकुल रोड परिसरातून ताब्यात (Unit 1 Action)घेतले.

 

आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून पुढील कारवाईसाठी चिंचवड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले (Unit 1 Action)आहे.

 

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, बांधकाम साईटवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला (Unit 1 Action)आहे.

 

 

अवैध बांधकाम कळीचा मुद्दा?

या घटनेनंतर संबंधित बांधकामाच्या सुरक्षिततेबाबत तसेच महानगरपालिकेकडून होणाऱ्या देखरेखीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अवैध किंवा नियमबाह्य बांधकामांकडे होत असलेले दुर्लक्ष भविष्यात आणखी गंभीर दुर्घटनांना कारणीभूत ठरू शकते, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू (Unit 1 Action)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00