पुणे : शिवसेना संघटनेत निष्क्रिय पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देत मोठा संघटनात्मक निर्णय घेण्यात आला आहे. पदे घेऊन काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावर ठेवायचे की नाही, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत उद्योगमंत्री तथा पुणे जिल्हा संपर्कप्रमुख उदय सामंत यांनी (Uday Samant) दिले.
मावळचे संपर्कप्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर उदय सामंत यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, महिला आघाडी, युवासेना व युवती सेनेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. थेरगाव येथील मोरया बॅंकेट हॉलमध्ये ही बैठक पार (Uday Samant)पडली.
या बैठकीस शिवसेना उपनेते खासदार श्रीरंग बारणे, उपनेते इरफान सय्यद, उपनेत्या सुलभा उबाळे, शहरप्रमुख नीलेश तरस, जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, समन्वयक बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हाप्रमुख दिलीप पांढारकर, शरद हुलावळे, नगरसेवक निलेश बारणे, युवासेना पदाधिकारी राजेंद्र तरस, रामभाऊ सावंत, विशाल हुलावळे, सागर पाचारणे तसेच युवती सेना जिल्हाप्रमुख सायली साळवी आणि शहरप्रमुख श्वेता कापसे यांची उपस्थिती (Uday Samant)होती.
उदय सामंत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पक्ष संघटनेच्या कामात कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श ठेवून प्रत्येक शिवसैनिकाने झोकून देऊन काम करावे. मतदार यादी तपासणीचे काम सुरू असून त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी (Uday Samant) दिल्या.
महत्त्वाचा निर्णय घेत कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून सर्व विद्यमान पदाधिकाऱ्यांना तत्काळ प्रभावाने प्रभारी म्हणून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील ३० दिवसांत मतदारसंघातील संघटनेच्या कामाचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. चांगली कामगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावर कायम ठेवले जाईल, तर निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदावरून दूर करून नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट (Uday Samant)केले.
खासदार श्रीरंग बारणे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, महापालिका निवडणुकीत संघटनेने कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. पदाची अपेक्षा न ठेवता संघटना वाढीसाठी काम करणे आवश्यक आहे. “मला पद मिळाले नाही तर मी जातो” अशी भूमिका कोणी घेऊ नये, असे आवाहन त्यांनी (Uday Samant)केले.
ते पुढे म्हणाले की, शिवसेनेची काम करण्याची पद्धत इतर पक्षांपेक्षा वेगळी असून विचारांवर श्रद्धा ठेवून काम केले जाते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक बळकट करण्याची ही मोठी संधी आहे. पुढील तीन वर्षांत कोणतीही निवडणूक नसल्याने संघटन वाढीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असेही त्यांनी नमूद (Uday Samant)केले.
