प्रतिनिधी: पिंपरी-चिंचवड व मावळ परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पुढील २० वर्षांचा विचार करून वीज पुरवठा सक्षम करण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत पिंपरी, चिंचवड, थेरगाव, रावेत आणि तीर्थक्षेत्र देहूगाव येथे नवीन उपकेंद्र उभारली जाणार असून ताथवडे येथे अतिउच्चदाब केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी (Shrirang Barane) दिली.
महावितरणच्या पुणे मुख्य कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत खासदार बारणे यांनी पिंपरी, चिंचवड व मावळ विधानसभा क्षेत्रातील सुरू असलेली, प्रलंबित आणि प्रस्तावित वीज प्रकल्पांची सविस्तर माहिती घेतली. या बैठकीस महावितरणचे अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित (Shrirang Barane ) होते.
खासदार बारणे यांनी सांगितले की, मामुर्डी उपकेंद्राचे मजबुतीकरण केले जाणार असून २२ केव्हीची भूमिगत वीजवाहिनी टाकण्यात येणार आहे. तसेच थेरगाव, चिंचवड, रावेत आणि पिंपरी येथे उपकेंद्रे कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे. देहूगाव येथे नवीन उपकेंद्र उभारले जाणार असून ताथवडे येथे अतिउच्चदाब उपकेंद्रासाठी यशदा परिसरातील जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू (Shrirang Barane )आहे.
रहाटणी येथेही अतिउच्चदाब केंद्र सुरू करण्यात येणार असून नवीन रोहित्र बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तळेगाव एमआयडीसीतील आंबी येथील अतिउच्चदाब केंद्राची क्षमता वाढविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला (Shrirang Barane )आहे.
वीजपुरवठा खंडित होण्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा नियोजन समितीमार्फत यंदा १७ कोटी रुपयांचा निधी वीज प्रकल्पांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच ‘प्रधानमंत्री सूर्यघर’ योजनेअंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांना रूफटॉप सोलर बसविण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. स्मार्ट मीटर बसविण्याबाबत जनजागृती करून तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यावर भर दिला जाणार (Shrirang Barane )आहे.
औद्योगिक क्षेत्राला दिलासा
तळेगाव एमआयडीसी परिसरातील औद्योगिक ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी विविध ठिकाणी अतिउच्चदाब व लघुदाब उपकेंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. लोणावळा, उर्से, अंबी, पवनानगर परिसरातही वीज व्यवस्था अधिक सक्षम करण्यात आली आहे. भंडारा डोंगर परिसरातील विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाली (Shrirang Barane )आहेत.
गहुंजे येथे नवीन केंद्र प्रस्तावित
गहुंजे येथे नवीन अतिउच्चदाब केंद्र उभारण्याचा प्रस्ताव असून त्यामुळे तळेगाव केंद्रावरील ताण कमी होणार आहे. तसेच मावळ तालुक्यातील ग्राहकांना अधिक स्थिर आणि अखंडित वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे. मिंडेवाडीतील केंद्रामुळे चाकण फेज-२वरील भार कमी होऊन औद्योगिक क्षेत्रालाही फायदा होणार असल्याचे खासदार बारणे यांनी (Shrirang Barane )सांगितले.
