प्रतिनिधी:आळंदी येथे श्री काळ भैरवनाथ जन्माष्टमी निमित्त ६ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान श्री काळ भैरवनाथ मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहात दररोज सकाळी ७:३० ते १० वाजेपर्यंत (Kal Bhairavnath Janmashtami) ज्ञानेश्वरी पारायण, १०:३० ते १२ गाथा भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, ५ ते ६ हरिपाठ आणि सायंकाळी ६ ते ८ कीर्तन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
बुधवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी वेदमूर्ती अनंत शास्त्री मुळे यांनी श्री काळ भैरवनाथ जीवनचरित्र कथा सांगितली. त्यांनी श्री क्षेत्र काशीचे महत्त्व तसेच ज्ञान आणि अहंकार यांबाबत सखोल विश्लेषण केले. मध्यरात्री १२ वाजता जन्मकथेपूर्वी मंदिरातील भाविकांना पुष्प देण्यात आले. त्यानंतर जन्मकथेच्या वेळी भाविकांनी पुष्पवृष्टी करत (Kal Bhairavnath Janmashtami) भक्तीभावाने सहभाग घेतला.
यानंतर श्री काळ भैरवनाथांची आरती झाली आणि भाविकांना आरती दाखवून प्रसादाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक (Kal Bhairavnath Janmashtami) उपस्थित होते.
https://majhapimprichinchwad.in/?p=2849
आज, दि. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत काल्याचे कीर्तन होणार असून, त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात (Kal Bhairavnath Janmashtami)आले आहे.
श्री काळ भैरवनाथ जन्माष्टमी उत्साहात आणि भक्तिभावाने (Kal Bhairavnath Janmashtami) साजरी करण्यात आली.
