(पिंपरी, प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड परिसरात शिक्षणासाठी राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना ओळखीचा गैरफायदा घेत त्रास देणे, लैंगिक छळ करणे तसेच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट ०१ ने अटक केली आहे. या कारवाईमुळे पुन्हा एकदा विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला (Sexual Harassment ) आहे .
सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे, गुन्हे शाखा युनिट 01 यांनी दखल घेऊन तात्काळ सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग यांच्या समवेत पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, सपोफौ प्रमोद वेताळ, संतोष इंगळे, पोलीस हवालदार 832 जयवंत राऊत, 1603 देवा राऊत, अजय डगळे, महादेव जावळे, पोलीस शिपाई 2331 केशव चेपटे, तेजस भालचिम यांचे पथक तयार करून सदर पथकाला मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना देऊन रवाना (Sexual Harassment ) केले.
सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी नामे रहिम मफिजुल रहेमान शेख, वय 27 वर्षे, रा. गायवासरू चौक, मोहन नगर, चिंचवड, पुणे, मूळ रा. डेंगापारा, थाना बुरवान, जि. मुर्शिदाबाद, राज्य पश्चिम बंगाल हा गुन्हा दाखल होताच पश्चिम बंगाल येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यास पिंपरी परिसरातून ताब्यात (Sexual Harassment ) घेतले.
तसेच दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी नामे न्युटन सर्जेन शेख, वय 20 वर्षे, रा. गायवासरू चौक, मोहननगर, चिंचवड, पुणे, मूळ थाना बुरवान, जि. मुर्शिदाबाद, राज्य पश्चिम बंगाल याचा शोध घेत असताना तो वडूज, जि. सातारा येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सदर ठिकाणी तात्काळ गुन्हे शाखा युनिट 01 कडील पथक रवाना करून त्यास गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात (Sexual Harassment ) आले.
वरील दोन्ही आरोपींविरुद्ध पिंपरी पोलीस स्टेशन येथे अनुक्रमे 1) गुन्हा रजिस्टर नंबर 205/20256 भा.न्या.सं. कलम 64, 64 (2) (एम), 351 (2), 352 व 2) गुन्हा रजिस्टर नंबर 206/20256 भा.न्या.सं. कलम 64, 64 (2) (एम), 351 (2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर दाखल गुन्ह्याच्या तपासकामी आरोपींना पिंपरी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले (Sexual Harassment ) आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्या असताना आरोपींनी त्यांच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर विश्वास संपादन करून मैत्रीचे नाते निर्माण केले. पुढे या ओळखीचा गैरफायदा घेत दोघींना सुमारे दोन वर्षांपासून त्रास दिला जात होता. पीडितांनी विरोध केल्यानंतर त्यांच्याकडील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार करण्यात(Sexual Harassment ) आली.
या गंभीर स्वरूपाच्या प्रकरणाची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे आणि सहकाऱ्यांनी तातडीने तपास सुरू(Sexual Harassment ) केला.
तपासादरम्यान पहिला आरोपी पश्चिम बंगालला पळून जाण्याच्या तयारीत असताना पिंपरी परिसरातून ताब्यात घेण्यात आला. दुसरा आरोपी सातारा जिल्ह्यातील वडूज येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे धाड टाकून त्यालाही ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी पिंपरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले (Sexual Harassment ) आहे.

या प्रकरणात विविध गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू (Sexual Harassment ) आहे.
अलीकडच्या काळात महिलांवरील छळ, धमक्या आणि लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारांना बळी पडणाऱ्यांनी भीती न बाळगता तातडीने पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. समाजातील प्रत्येक घटकाने महिलांच्या सुरक्षिततेबाबत संवेदनशील राहण्याची गरज असल्याचेही या घटनेतून अधोरेखित झाले(Sexual Harassment ) आहे.


