Home गुन्हे Nigdi Crime News:निगडीत धारदार हत्यारासह तरुण ताब्यात; गुन्हे शाखेची कारवाई

Nigdi Crime News:निगडीत धारदार हत्यारासह तरुण ताब्यात; गुन्हे शाखेची कारवाई

रोड परिसरात गुप्त माहितीच्या आधारे सापळा; भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी ): गुन्हे शाखा युनिट ०१ ने निगडी परिसरात कारवाई करत बेकायदा धारदार लोखंडी हत्यार बाळगणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला (Nigdi Crime News) आहे.

 

ही कारवाई १९ एप्रिल रोजी राजनगर ओटास्किम, निगडी येथील महानगरपालिकेच्या सुलभ शौचालयामागील स्पाईन रोडलगत सर्व्हिस रोडवर करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून प्रणय बाबासाहेब बनकर (वय १९, रा. निगडी) याला (Nigdi Crime News)पकडले.

 

पोलीस आयुक्तालयाच्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार शस्त्रे बाळगण्यास मनाई असतानाही आरोपीकडे धारदार लोखंडी हत्यार आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन निगडी पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी हजर (Nigdi Crime News)केले.

 

ही कारवाई पोलीस हवालदार जयवंत राऊत, विजय शेळकंदे तसेच पथकातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली (Nigdi Crime News)केली.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00