Home माझं पिंपरी चिंचवड Asthi Kalash:दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थि कलश दर्शनाचा कार्यक्रम पिंपरीत उद्या

Asthi Kalash:दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थि कलश दर्शनाचा कार्यक्रम पिंपरीत उद्या

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने आयोजन; देहू येथील इंद्रायणी नदीत अस्थी विसर्जन होणार

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या अस्थि कलश दर्शनाचा कार्यक्रम मंगळवार, दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला (Asthi Kalash) आहे.

हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रांगण, मुंबई–पुणे महामार्ग, पिंपरी येथे सकाळी ११ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत पार पडणार आहे. या वेळी नागरिकांना दिवंगत नेत्यांच्या अस्थि कलशाचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार (Asthi Kalash)आहे.

अस्थि कलश दर्शनानंतर सदर अस्थी देहू येथील पवित्र इंद्रायणी नदीमध्ये विधीपूर्वक विसर्जित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच अजितदादा पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले (Asthi Kalash) आहे.

हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष तथा माजी महापौर योगेश मंगलसेन बहल यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला (Asthi Kalash) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00